- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई गोळा केलेला कचरा वाहनांमध्ये भरून त्यांची विल्हेवाट देवनार, कांजूरमार्ग तसेच मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर लावण्यासाठी सन २०१८मध्ये सात वर्षांसाठी कंत्राट देण्यात आले होते. परंतु यासर्व खासगी कंपन्यांना दिलेल्या कंत्राटदारांच्या गाड्या बंद पडत असून महापालिकेच्या गाड्यांवरच याचा भार पडत आहे. खासगी कंत्राटदारांच्या कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या बंद पडत असल्याने महापालिकेच्या वाहनांद्वारे कचरा वाहून नेण्याची वेळ येत आहे, तसेच ही वाहने बंद असल्याने बऱ्याच ठिकाणी जेसीबीद्वारे कचरा उचलून डंपरद्वारे कचरा वाहून नेण्याची वेळ खासगी कंत्रादारांवर येत असून याप्रकरणी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत आहे. (BMC)
(हेही वाचा – Hawkers : टोरेसमुळे महापालिका आणि पोलिसांना रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या आतील फेरीवाले दिसले?)
मुंबईतील कचरा वाहून नेऊन डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यासाठी सन २०१८ मध्ये एकूण एकूण १४ गटांमध्ये काम विभागून पुढील सात वर्षांसाठी १८०० कोटींचे कंत्राट दिले. परंतु कंत्राट संपुष्टात येण्याच्या काही दिवस आधीच मुंबईतील अनेक भागांमध्ये खासगी कंत्राटदारांकडून कामांमध्ये चालढकलपणा सुरु असून अनेक कंत्राटदारांची वाहने जुनी झाल्याने ती नादुरुस्त ठरत आहेत. त्यामुळे कंत्राटदारांकडून नवीन वाहने उपलब्ध करून दिले जात नसल्याने महापालिकेच्या स्वत:च्या वाहनांची सेवा घेण्याची वेळ आली आहे. महापालिका सफाई कामगारांच्या म्हणण्यानुसार, कंत्राटदारांची वाहने वेळेवर येत नसल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग तसेच कचरा पेट्या भरलेल्या पहायला मिळतात. कंत्राटदाराकडून पुरवली जाणारी काही वाहने बंद असल्याने उपलब्ध असलेल्या वाहनांद्वारे कचरा उचलला जातो, परिणामी अनेक ठिकाणी कचरा वेळीच उचलला जात नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. (BMC)
(हेही वाचा – BEST Bus : बेस्टची बस थेट चहाच्या टपरीवर)
मुंबईतील कचरा वाहून नेण्याच्या कामांमध्ये मुलुंडचा टी-प्रभाग, कांदिवली आर-दक्षिणचा प्रभाग आणि बोरिवली व दहिसरमधील आर मध्य व आर-उत्तर प्रभागातील कचरा उचलण्यासह विल्हेवाट लावण्यासाठी कंत्राटदार नेमत सर्वच जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे या सर्व प्रभागांमध्ये वाहनांसोबतच कंत्राटी कामगारही संबंधित कंपनी पुरवत असून या ठिकाणी कचरा उचलण्याच्या कामात महापालिकेच्या कामगारांचा हस्तक्षेप नाही. परंतु उर्वरीत प्रभागांमध्ये ७० टक्के खासगी कंपनी आणि ३० टक्के महापालिकेची वाहनांद्वारे कचऱ्याची वाहतूक करून विल्हेवाट लावली जात आहे. परंतु या प्रभागांमध्ये महापालिकेच्या कामगारांमार्फत कचरा गोळा केल्यानंतर तो कचरा उचलून त्याची वाहतूक करून डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यासाठी गाड्या बंद असल्याने विलंब होत आहे आणि याचा परिणाम कचरा उचलण्याच्या कामांवर होत आहे. महापालिकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही जेव्हा विभागांमध्ये कचऱ्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर खासगी कंपनीशी संपर्क साधतो, परंतु त्यांची वाहनेच उपलब्ध होत नाही. बऱ्याच वेळा वाहने बंद पडल्याने संख्या कमी झाल्याने वेळेवर वाहने उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे परिस्थितीत महापालिकेची वाहने पाठवून कचरा उचलला जाता आणि मग ते वाहन हायवांमध्ये रिकामा केला जातो. मुंबईतील मुलुंड, कांदिवली, बोरीवली, दहिसर वगळता अन्य प्रभागांमध्ये ही अवस्था पाहायला मिळत असून वाहने उपलब्ध न झाल्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कोणत्याही प्रकारचा दंड वसूल केला जात नसल्याचे बोलले जात आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community