-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर नवीन आर्थिक वर्षाच्या तसेच गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला मुंबई महापालिकेच्या उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्या बढती आणि बदली करून महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी एकप्रकारे खांदेपालट केली आहे. मुंबई महापालिकेतील सह आयुक्त तथा उपायुक्त यांच्या बदली करण्यात आल्या आहेत. तसेच नवीन सहाय्यक आयुक्त यांच्या नियुक्तीनंतर सहायक आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तपदी असलेल्या अधिकाऱ्यांच्या या बढती आणि बंपर बदलीमुळे नवीन आर्थिक वर्षात आता नवीन अधिकारी नव्या जोमाने कामाला लागलेले पाहायला मिळणार आहेत. मुंबई महानगरपालिकेतील सात उपायुक्त तसेच एकूण बारा सहाय्यक आयुक्त यांच्या बदल्या/पदस्थापना विषयक आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या आदेशान्वये निर्गमित करण्यात आले आहेत. (BMC)
(हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी दरमहा ५० हजार रुपये देण्याचे DCM Eknath Shinde यांचे आदेश !)
सहआयुक्त तथा उपायुक्त संवर्गातील बदली
विश्वास शंकरवार, सहआयुक्त (परिमंडळ ४) ➡ सहआयुक्त (कर निर्धारण व संकलन) (+संपर्क अधिकारी, मागासवर्ग कक्ष)
डॉ. भाग्यश्री कापसे, उपायुक्त (परिमंडळ ७) ➡ उपायुक्त (परिमंडळ ४)
संजय कुऱ्हाडे, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) (+प्रकल्प संचालक, मुंबई जिल्हा एडस् नियंत्रण संस्था) ➡ उपायुक्त (परिमंडळ ७)
उपायुक्त म्हणून पदोन्नती
शरद उघडे, सहायक आयुक्त (डी विभाग) ➡ उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) (+माहिती तंत्रज्ञान विभाग) (+प्रकल्प संचालक, मुंबई जिल्हा एडस् नियंत्रण संस्था)
अजित आंबी, सहायक आयुक्त (जी उत्तर विभाग) ➡ उपायुक्त (उद्याने)
पांडुरंग गोसावी, प्रमुख लेखापाल (पाणीपुरवठा व मलनिसारण) ➡ उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते)
विश्वास मोटे, सहायक आयुक्त (एम पश्चिम विभाग) ➡ उपायुक्त (परिमंडळ ३) (BMC)
(हेही वाचा – Kunal Kamra ला मद्रास हायकोर्टाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर)
सहायक आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या
विनायक विसपुते, सहायक आयुक्त (एच पश्चिम विभाग) ➡ सहायक आयुक्त (जी उत्तर विभाग) (+सहायक आयुक्त, अतिक्रमण निर्मूलन, पूर्व व पश्चिम उपनगरे)
मनीष वळंजू, सहायक आयुक्त (के पूर्व विभाग) ➡ सहायक आयुक्त (डी विभाग) (+सहायक आयुक्त, बाजार विभाग – अतिरिक्त कार्यभार)
अलका ससाणे, सहायक आयुक्त (एम पूर्व विभाग) ➡ सहायक आयुक्त (एस विभाग)
नितीन शुक्ला, सहायक आयुक्त (एफ उत्तर विभाग) ➡ सहायक आयुक्त (बी विभाग)
(हेही वाचा – गुढीपाडव्याच्या दिवशी PM Narendra Modi नागपूर दौऱ्यावर)
नव्याने निवडी झालेला सहायक आयुक्त आणि त्यांच्यावरील पदभार
दिनेश पल्लेवाड ➡ सहायक आयुक्त, एच पश्चिम विभाग
योगिता कोल्हे ➡ सहायक आयुक्त, टी विभाग
उज्वल इंगोले ➡ सहायक आयुक्त, एम पूर्व विभाग
अरूण क्षीरसागर ➡ सहायक आयुक्त, एफ उत्तर विभाग (BMC)
सहायक आयुक्त पदाचा आणि अतिरिक्त कार्यभार
अजय पाटणे – सहायक आयुक्त (टी विभाग) (कार्यभार) ➡ सहायक आयुक्त (पी दक्षिण विभाग) (कार्यभार)
शंकर भोसले – सहायक आयुक्त, बी विभाग (कार्यभार) ➡ सहायक आयुक्त (एम पश्चिम विभाग) (पूर्णकालिक कार्यभार)
नवनाथ घाडगे – उपप्रमुख अभियंता (प्रभारी), वस्ती स्वच्छता कार्यक्रम, घनकचरा व्यवस्थापन खाते ➡ सहायक आयुक्त (के पूर्व विभाग) (अतिरिक्त कार्यभार)
संजय इंगळे, उपप्रमुख अभियंता (पूल) ➡ सहायक आयुक्त (सी विभाग) (पूर्णकालिक कार्यभार)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community