- विशेष प्रतिनिधी, मुंबई
पूर्व मुक्त मार्ग अर्थात इस्टर्न फ्री वेवरील माहूल खाडीवरील सध्याच्या दोन पुलांच्या दोन्ही बाजूकडील रस्ता खचल्यामुळे वाहनांना दणके बसत असून यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात. परंतु याठिकाणी नवीन रस्ते बांधुनही या रस्त्याचा भाग खचत राहत असल्यामुळे याठिकाणी नव्याने पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आहे तसेच भक्ती मार्ग वसाहत ते जिजामाता चौक या दरम्यान या पुर्व मुक्त मार्गाच्या दोन्ही बाजूस १० मी रुंदीच्या रस्त्याचे बांधकाम करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. (BMC)
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या माध्यमातून पूर्व मुक्त मार्गाचे बांधकाम करण्यात आले आणि वाहतुकीला हा मार्ग खुला करून दिल्यानंतर मे २०१५ रोजी एमएमआरडीएने महापालिकेला हा मार्ग पुढील देखभाल आणि दुरुस्तीसाठी हस्तांतरीत केला. त्यानंतर या मार्गाची देखभाल आणि दुरुस्ती महापालिकेच्यावतीने केली जात आहे. मात्र, या मार्गावरील दोन्ही बाजूला रस्त्याचा भाग खचणे आणि काही ठिकाणी अरुंद असल्याने पूल बांधणे आणि रुंदीकरण करण्याचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येणार आहे. (BMC)
(हेही वाचा – बांगलादेशी घुसखोरांना कोलकातातून मदत; मंत्री Yogesh Kadam यांचा दावा)
महापालिकेच्या पूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्व मुक्त मार्गावरील आणिक पांजरपोळ जोडरस्त्या येथील माहूल खाडीवरील सद्यस्थितीतील दोन पूलांच्या दोन्ही बाजूकडील रस्ता खचल्यामुळे वाहनांना दणके बसतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या ठिकाणची जमीन ही कमकुवत असल्याकारणाने नवीन रस्ते बांधुनही या रस्त्याचा भाग खचत राहतो. त्यामुळे या ठिकाणी पूल बांधणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भक्ती मार्ग वसाहत ते जिजामाता चौक या दरम्यान या पूर्व मुक्त मार्गाची रुंदी ६० मी ऐवजी ४० मी एवढी आहे. २०३४ च्या विकास नियोजन नियमावली नुसार पुर्व मुक्त मार्गाच्या दोन्ही बाजूस १० मी रुंदीच्या रस्त्याचे बांधकाम करणे आवश्यक आहे. त्या रुंदीकरणाचे कामही महापालिकेच्यावतीने हाती घेतले जाणार आहे. (BMC)
एमएमआरडीए वसाहत ते भक्ती पार्क वसाहत यांना जोडणाऱ्या भूयारी मार्गाची उंची कमी असल्याने आणीबाणीच्या प्रसंगात रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या या भुयारी मार्गामधून जाणे शक्य नाही. त्यामुळे पुर्व मुक्त मार्गाच्या दोन्ही बाजुने सेवा रस्त्याचे बांधकाम करणे क्रमप्राप्त आहे, त्यामुळे ही कामे तातडीने करण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या सीआरझेडच्या मंजुरी प्राप्त करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community