BMC : स्मशानभूमींसह रस्त्यावरील पथदिवे जोडणार जीपीएस यंत्रणेला; बिघाड आणि दुरुस्तीची माहिती अधिकारी घेणार वेबवरून

219
BMC : स्मशानभूमींसह रस्त्यावरील पथदिवे जोडणार जीपीएस यंत्रणेला; बिघाड आणि दुरुस्तीची माहिती अधिकारी घेणार वेबवरून
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेच्यावतीने स्मशानभूमी प्रणाली, उद्वाहन, सौर उर्जेचे छतावरील पॅनल, महापालिकेतंर्गत बसविण्यात आलेले घरगुती पाण्याचे पंप, महानगरपालिका हद्दित उभारण्यात आलेले पथदिवे आणि हायमास्ट यांची अद्ययावत माहिती ही कामांचे पुनरावृत्ती टाळण्यासाठी आता या सर्व मालमत्ता जीपीएस प्रणालीला जोडली जाणार आहे. यासाठी आता महापालिकेच्या यांत्रिक व विद्युत विभागाच्यावतीने वेब आणि मोबाईल अॅप्लिकेशन्स बनवली जाणार आहे. ज्यामुळे आता स्मशानभूमीसह पथदिव्यांची दुरुस्ती कधी केली आहे किंवा करायची आहे याची माहिती या प्रणालीवर उपलब्ध होऊ शकणार आहे. (BMC)

(हेही वाचा – Assembly Election 2024 : निवडणुकीचा मागोवा घेणारे कॉफी टेबल बुक महापालिकेकडून प्रकाशित)

मुंबई महापालिकेच्या यांत्रिक व विद्यान विभागाच्यावतीने महानगरपालिकेची रुग्णालये, महापालिका शाळा, उद्याने, खेळांची मैदाने, स्मशानभूमी या विविध खात्यांसाठी असलेली यांत्रिकी व विद्युत यंत्रणा, साधनसामुग्री इत्यादींचे नियोजन करून त्यांची उभारणी, देखभाल आणि दुरुस्ती आदी कामे पाहिली जातात. यामध्ये विशेषत: उद्वाहने (लिफ्ट), विद्युत शववाहिनी, लाकडी चितेकरिता हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा, निरनिराळ्या वैद्यकीय संस्थामध्ये बसविलेली अद्ययावत वैद्यकीय उपकरणे, स्मशानभूमी व विद्युत/गॅस शवदाहिनी यांची दुरुस्ती आणि देखभालीची कामे या खात्यामार्फत पार पाडली जातात, तसेच तसेच ऊर्जा बचतीच्या संदर्भात महाराष्ट्र शासनातर्फे प्रसारित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे ऊर्जा बचत, ऊर्जा देखभाल, सौर खात्यामार्फत हाती घेण्यात आली आहेत. ऊर्जेवर आधारित दिवे आणि पाणी तापविण्याची यंत्रणा लावण्याची कामेही या खात्यामार्फत केली जातात. (BMC)

(हेही वाचा – बालगृहातील मुली आणि माजी संस्थाश्रयी महिलांचे प्रश्न तातडीने सोडवा; उपसभापती Dr. Neelam Gorhe यांचे निर्देश )

या यांत्रिक व विद्युत विभागामार्फत स्मशानभूमी प्रणाली, लिफ्ट, सौर उर्जेचे छतावरील पॅनल, महापालिकेतंर्गत बसविण्यात आलेले घरगुती पाण्याचे पंप, मुंबईत उभारण्यात आलेले पथदिवे आणि हायमास्ट यांची अद्ययावत माहिती ही कामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि पुर्ण झालेल्या कामाच्या सुलभ सेवा व देखभाल करण्यासाठी खूप आवश्यक आहे. त्यामुळे ही माहिती अद्ययावत करण्याकरिता प्रमुख कामांची जीआयएस (जिओग्राफीकल इन्फॉर्मेशन सिस्टीम) मध्ये मॅपिंग करण्यात येणार असल्याची माहिती यांत्रिक व विद्युत विभागाच्यावतीने यांत्रिक व विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही माहिती प्रणाली विकसित करण्यात येणार असून यासाठी सुमारे ७५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. याचे प्रशिक्षण या खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.