- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येणाऱ्या विविध महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये तांत्रिक आराखड्याची फेरतपासणी करण्यासाठी आयआयटी मुंबई आणि व्हिजेटीआयची मदत घेतली जात असली तरी प्रत्यक्षात या सल्लागार कंपनीला आता सुरतमधील कंपनी टक्कर देणार आहे. सुरतमधील एसव्हीएनआयटी या सल्लागाराची नेमणूक विद्याविहार रेल्वे स्थानकावर पोहोचणाऱ्या एलबीएस मार्ग व आरसी मार्ग यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या बांधकामाच्या आराखड्याची फेरतपासणीच्या कामासाठी केली आहे. त्यामुळे या माध्यमातून सुरतमधील एसव्हीएनआयटी या संस्थेने मुंबई महापालिकेत प्रवेश केला आहे. (BMC)
घाटकोपर एन विभागातील लालबहादूर मार्ग आणि आरसी मार्ग यांना जोडणाऱ्या पुलाचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. या पुलाच्या बांधकामासाठी महापालिकेने एसबी इन्फ्राबिल्ड लिमिटेड कंपनीची निवड करून फेब्रुवारी २०१४ पासून प्रत्यक्ष्, कामाला सुरुवात झाली आहे. या पुलाच्या बांधकामाचा संरचनात्मक आराखडा हा टीपीएफ इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. या सल्लगारामार्फत संपूर्ण जागांचे सर्वेक्षण, मातीच्या थरांची तपासणीची आदी कामे पूर्ण करून या उड्डाणपुलाच्या बांधकामाचे आराखडे बनवण्यात आलेले आहेत. (BMC)
(हेही वाचा – Bangladesh मध्ये इस्लामिक कट्टरपंथींनी पुजारीसह ३ हिंदूंचे केले अपहरण; बशीर, आरिफसोबत ४ जणांना अटक)
या टीपीएफ इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने या पुलाच्या बांधकामाचे आराखडे बनवल्यानंतर या आराखड्याची फेरतपासणी करण्यासाठी महापालिकेने भारतीय प्राद्योगिक संस्थान मुंबई अर्थात आयआयटी मुंबई आणि सरदार वल्लभभाई राष्ट्रीय प्राद्योगिक संस्थान, सुरत अर्थात एसव्हीएनआयटी यांच्याकडून सल्लागार सेवेसाठी प्रस्ताव मागवले होते. त्याला दोन्ही संस्थांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे मुंबई आयआयटी संस्थेने १७.५० लाख रुपये तर सुरतमधील एसव्हीएनआयटी संस्थेने ६ लाख रुपये एवढ्या दराची बोली लावली. त्यामुळे सुरतमधील एसव्हीएनआयटी ही संस्थेने कमी बोली लावल्याने महापालिकेने या पुलाच्या बांधकामाच्या आरखडा फेरतपासणीसाठी सल्लागार म्हणून नेमणूक केली असल्याची माहिती मिळत आहे. (BMC)
मुंबई महापालिकेच्या विविध विकासकामांसाठी बांधकाम आराखडा बनवण्यासाठी तालिकेवरील सल्लागाराची नेमणूक करण्यात येत असली तरी या सल्लागाराने बनवलेल्या आराखड्याची फेरतपासणी करण्यासाठी आजवर आयआयटी मुंबई आणि व्हीजेटीआय या संस्थांची नेमणूक केली जात असली तरी मुंबईतील या संस्थांना आता एसव्हीएनआयटी, सुरत ही टक्कर देत असून या माध्यमातून या संस्थेने महापालिकेत प्रवेश केल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे आयआयटी मुंबईच्या तुलनेत सुरतमधील एसव्हीएनआयटीने निम्म्या दरात बोली लावत महापालिकेतील आपला प्रवेश सुकर केला आहे. त्यामुळे भविष्यात महापालिकेच्या विविध बांधकामांच्या आराखड्याची तपासणी करण्यासाठी आयआयटी मुंबई आणि व्हीजेटी आय या संस्थांबरोबरच सुरतमधील एस व्ही एन आय टीची संस्थेमध्ये स्पर्धा दिसून येणार आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community