- सचिन धानजी,मुंबई
मुंबई महापालिकेच्यावतीने (Municipal Corporation) घनकचरा व्यवस्थापन संबंधित कामाकरीता आता सल्लागाराची मदत घेतली जाणार असून या सल्लगार सेवेसाठी महापालिकेच्यावतीने संस्थेची निवड करण्यात आली आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने टंडन अर्बन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची निवड करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून आता घनकचरा व्यवस्थापन विभागाची सर्व प्रकारची कामे पार पाडली जाणार आहे आणि त्यामुळे महापालिकेच्या (Municipal Corporation) अभियंत्यांची निविदा काढण्यापासून ते पुढील सर्व प्रक्रियेतून सुटका होणार आहे. विशेष म्हणणे आतापर्यंत या विभागासाठी कधीही सल्लागाराची नेमणूक करण्यात आली नव्हती. (BMC SWM )
(हेही वाचा- Mohammad Qasim Gujjar : दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड महंमद कासिम गुज्जर दहशतवादी म्हणून घोषित)
इतर विभागांमध्ये अशाप्रकारच्या प्रकल्पाच्या कामांसाठी सल्लागार सेवा
मुंबईत सध्या कांजूर एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन सुविधा अर्थात कांजूर भराव भूमी आणि देवनार भराव भूमीवर दरदिवशी सुमारे ७००० मेट्रीक टन एवढा कचरा प्राप्त होतो. प्रकल्पांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी रिअलटाइम आधारावर घन कचरा व्यवस्थापन अंतर्गत समर्पित सल्लागार संस्थांची आवश्यकता आहे. महानगरपालिकेतील इतर विभागांमध्ये अशाप्रकारच्या प्रकल्पाच्या कामांसाठी सल्लागार सेवा देण्यासाठी सल्लागार संस्थांची यादी तयार करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर, मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित कामांकरिता सल्लागार संस्थांची यादी पाच वर्षाच्या कालावधीसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. (BMC SWM )
यासाठी नेमणार सल्लागार
यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये टंडन अर्बन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, केपीएमजी अडवायझरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, राईट्स आदींनी भाग घेतला. यामध्ये टंडन अर्बन या संस्थेला ९५ टक्के गुण मिळाले असल्याने अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगरे यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समितीने टंडन अर्बन या संस्थेची शिफारस केली आहे. महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सल्लागार नेमण्याचा उद्देश असा आहे की, जागतिक स्तरावर सर्वोत्तम तांत्रिक पद्धतींचा वापर करणे आणि तपशीलवार, कठोर गुणवत्ता नियंत्रण उपाय लागू करणे आहे. हा सल्लागार प्रकल्प अहवाल सुरू झाल्यापासून निविदा तयार करणे, निविदा मागविणे आणि कंत्राट देण्यापर्यंत तसेच कंत्राट सुरू झाल्यावर कामावर नियंत्रणाकरिता स्वतंत्र अभियंता म्हणून काम करेल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (BMC SWM )
(हेही वाचा- LPG Cylinder : एलपीजी सिलिंडरवर मिळणाऱ्या अनुदानात एका वर्षाची वाढ)
यासाठी घेतली जाणार सल्लागार सेवा
सध्या, प्रकल्प पर्यवेक्षण दुय्यम अभियंता, सहायक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्यासह विभागाचे कर्मचारी करतात. परंतु हे प्रकल्प पर्यवेक्षक त्यांच्या नियुक्त प्रकल्पांवर देखरेखी व्यतिरिक्त आरटीआय, तक्रारी, विविध बैठका, अहवाल तयार करणे, नवीन प्रकल्पांसाठी निविदा काढणे आणि छाननीशी संबंधित इतर आवश्यक कर्तव्ये तसेच विविध महापालिका विभाग आणि राह्य एजन्सी यांच्याशी नियमित समन्वय साधतात. या सर्व बाबींमध्ये प्रकल्प पर्यवेक्षक व्यस्त सल्यामुळे प्रभावी साइट पर्यवेक्षणात अडथळा निर्माण होतो, असे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले. (BMC SWM )
घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सुरु असलेले प्रकल्प प्रकल्प
-गोराई क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करणे.
-कांजूर क्षेपणभूमी येथे शास्त्रोक्त एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन सुविधा.
-मुलुंड क्षेपणभूमी, मुलुंड येथे क्षेपणभूमी साईट रिक्लेमेशनचा प्रकल्प.
-देवनार क्षेपणभूमीचे प्रचालन व परिरक्षण.
-महालक्ष्मी, कुर्ला, वर्सोवा आणि गोराई येथील विविध कचरा हस्तांतरण केंद्राचे प्रचालन व परिरक्षण,
-देवनार येथे ६०० टनप्रतिदिन ची कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प
-बीपीसीएलसाठी कोजूर शास्त्रोक्त एकात्मिक घरकचरा व्यवस्थापन बायो सिएनजी प्रकल्प
-देवनार सी साइटसाठी १५०० टन प्रतिदिन कचरा ते ऊर्जा प्रकल्प
-कांजूर शास्त्रोक्त एकात्मिक घन कचरा व्यवस्थापन सुविधा साइटवर कचऱ्यापासून
(हेही वाचा- Sunil Tatkare : जागावाटपाबाबत मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून चर्चा झालेली नाही; सुनील तटकरे म्हणाले…)
ऊर्जा अथवा बायो-मिथेनशन प्रकल्प
– कचरा हस्तांतरण आणि व्यवस्थापन वाढविण्यासाठी बाजारात नवीनतम उपलब्ध तंत्रज्ञानाचे मूल्यमापन आणि अंमलबजावणी करून कचरा हस्तांतरण केंद्राये आधुनिकीकरण
-गोराई क्षेपणभूमी बंद करण्याच्या जागेवर घ्कव्य माहिती केंद्र व सौरऊर्जा प्रकल्प
– देवनार क्षेपणभूमी वरील परंपरागत कचऱ्यावर प्रक्रिया करणे
– १५०० टनप्रतिदिन बांधकाम व पाडकाम (C&D) कचरा प्रक्रिया प्रकल्प (अतिरिक्त)
– पुढील ५ वर्षात हाती घेतले जाणारे इतर कोणतेही प्रकल्प.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community