असल्फा मेट्रो स्थानकाजवळील अनधिकृत इमारत आणि हॉटेल्सवर BMC ची कारवाई

मुंबई महानगरपालिका (BMC) हद्दीतील अनधिकृत, वाढीव बांधकामांवर सातत्याने कारवाई सुरू आहे.

47

कुर्ला  एल विभागात साकीनाका येथील सफेद पूल येथील औद्योगिक परिसरात अनधिकृतपणे उभारलेले हॉटेलसाठीचे वाढीव बांधकाम, अंतर्गत भिंतीचे पाडकाम करण्यात आले. तसेच साकीनाका येथील ९० फूट मार्गावरील दोन विश्रामगृहांचे (डॉर्मेटरी) मजले, साकीनाका (असल्फा मेट्रो स्थानक) येथील १८ खोल्या असलेली इमारत, ४० खोल्या असलेली अनधिकृत हॉटेल इमारत आदींवर तोडक कारवाई करण्यात आली.

मुंबई महानगरपालिका (BMC) हद्दीतील अनधिकृत, वाढीव बांधकामांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार आणि  अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे.

(हेही वाचा नायर रुग्णालयातच Clean-up Marshals कडून रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची लूट)

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC)  कुर्ला एल विभाग हद्दीत असलेली अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली आहेत. त्यात अंतर्गत भिंत, अनधिकृत मजले, अनधिकृत बांधकाम यांचा समावेश आहे. हॉटेल्स, विश्रामगृह (डॉर्मेटरी), औद्योगिक परिसरातील बांधकामे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. यापुढे देखील ही कारवाई पुढे अविरत सुरू राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

उपआयुक्त (परिमंडळ ५) देविदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (एल विभाग) धनाजी हेर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी ३० कामगार, ३० पोलीस, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंते, कनिष्ठ अभियंते सहभागी झाले होते. कारवाईसाठी आवश्यक पोकलेन, जेसीबी ही संयंत्रे आणि वाहने पुरविण्यात आली. (BMC)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.