- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्यच सध्या बिघडत असल्याचे दिसून येत आहे. आधीच सखोल स्वच्छता मोहिमेमुळे तत्कालिन अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांचे आधीच आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष होत होते, परंतु त्यांच्या बदलीनंतर या पदाची धुरा सांभाळणाऱ्या डॉ. विपीन शर्मा यांच्याकडून आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन सार्वजनिक आरोग्य विभागाबाबत गंभीर नसल्याने भविष्यात महापालिकेचे आरोग्य व्हेंटिलेटरवर दिसेल असेच काही चित्र निर्माण होऊ लागले आहे. (BMC)
मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकरता सन २०२४-२५च्या अर्थसंकल्पामध्ये सुमारे १७०० कोटी रुपयांची तरतूद केली असून आधी सखोल स्वच्छता मोहिम आणि त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमधील अधिष्ठाता तसेच उपनगरीय रुग्णालयांचे अधिक्षक यांना अतिरिक्त आयुक्तांच्या बैठकीच्या वेळाच मिळत नसून अतिरिक्त आयुक्तांकडून आरोग्य विभागाच्या प्रश्नाला प्राधान्य दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयात सुविधा आणि महत्त्वाच्या कामांना मंजुरी मिळत नसल्याने आरोग्य विभागाचा समतोल बिघडत चालल्याचे दिसून येत आहे. (BMC)
(हेही वाचा – बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचा कळस; खासदाराने घेतली गृहमंत्री Amit Shah यांची भेट)
महापालिकेचे तत्कालिन अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी आरोग्य विभागाकडे जातीने लक्ष घालून डॉक्टर आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त लावण्यासह तेथील स्वच्छतेवर भर दिला होता. परंतु घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत सखोल स्वच्छता मोहिमेची जबाबदारी याच अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याकडे असल्याने त्यांनी स्वच्छता माहिमेला प्राधान्य दिले. यामध्ये आरोग्य विभागाकडील त्यांचे लक्ष कमी झाले होते. परंतु त्यांच्या बदलीनंतर या पदाचा भार अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांच्याकडे न देता प्रशासनाने अतिरिक्त आयुकत प्रकल्प अभिजित बांगर यांच्याकडे सोपवला. (BMC)
बांगर यांच्याकडे तात्पुरता पदभार असतानाही त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली आणि त्यात मुंबईतील सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय सेवा पुरविणारी यंत्रणा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अधिक सज्ज व अधिक सतर्क ठेवा, त्यासोबतच रूग्णालयातील स्वच्छता, रूग्णसेवा, औषध पुरवठा, प्रसाधनगृहे आदी सुविधा नियोजनबद्धरित्या आणि काटेकोरपणे पुरवण्याचे निर्देश होते. (BMC)
(हेही वाचा – Ind vs Aus, Brisbane Test : ब्रिस्बेन कसोटीत पहिल्या डावांत भारतीय फलंदाजी पुन्हा ढेपाळली)
तसेच मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणारे रूग्ण आणि रुग्णांसोबत येणारे नातेवाईक व आप्त यांच्यासोबत रुग्णालयातील कर्मचारी यांची वर्तवणूक नम्र आणि आपुलकीची रहावी तसेच रूग्ण आणि नातेवाईकांना कर्मचाऱ्यांमार्फत अरेरावीची भाषा वापरली जाणार नाही याची यासाठी प्रकर्षाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगत सर्व रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांना एकप्रकारे डोसच दिला होता. (BMC)
त्याबरोबरच महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा पुरवताना अधिकाधिक तंत्रज्ञानावर भर देतानाच प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठीआरोग्याशी संबंधित सेवा घेण्यासाठी येणाऱ्या रूग्णांना आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या माध्यमातून दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही केल्या होत्या. परंतु शिंदे यांच्या बदलीनंतर या रिक्त जागी डॉ. विपिन शर्मा यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याकडे आरोग्य विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर यापूर्वी बांगर यांनी दिलेल्या निर्देशाकडे रुग्णालयाच्या अधिकारी आणि कर्मचारी आता दुर्लक्ष केला आहे. (BMC)
(हेही वाचा – काँग्रेसने स्वार्थासाठी घटनादुरूस्ती केली; Nirmala Sitharaman यांचा काँग्रेसला टोला)
मागील ३१ ऑगस्ट २०२४ मध्ये विपीन शर्मा यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याकडे या आरोग्य विभागाची धुरा सोपवण्यात आल्यानंतर प्रथम लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे आरोग्य विभागाची महत्त्वाची कामे रखडली गेली. आता आचारसंहिता उठल्यानंतरही आरोग्य विभागाचे काम गतीशील करण्यास विपीन शर्मा हे अनुत्सुक दिसत आहेत. एचएमआयएस सिस्टीम असो वा आपला दवाखाना असो वा उपनगरीय रुग्णालयांमधील विविध प्रश्न आणि डॉक्टर, नर्सेसचे प्रश्न, प्रमोशन आणि बढती तसेच बदली आदींचे प्रश्न सोडवण्यात अतिरिक्त आयुक्तांकडून स्वारस्य दाखवले जात नाही. तसेच अनेक रुग्णालय पुनर्विकासाची कामे आदी कामांचा आढावा घेण्यात विपीन शर्मा यांचा कल दिसून येत नाही. (BMC)
आज महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये झिरो प्रिक्रिप्शन योजना असो वा मुख्यमंत्री आरोग्य आपल्या दारी आदी योजना राबवण्यात महापालिकेला अपयश येत असून आरोग्य विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर याचा आढावा प्रभावशील मांडून त्याला गती देण्याचा प्रयत्न करताना ते दिसत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाचे आरोग्यच आता हळूहळू बिघडताना दिसत असून भविष्यात याकडे अशाचप्रकारे दुर्लक्ष झाल्यास महापालिकेचे आरोग्यच बिघडून जाईल अशी भीती वर्तवली जात आहे. प्राथमिक आरोग्य ही महापालिकेचे बंधनकारक कर्तव्य असून याच विभागाचे अतिरीक्त आयुक्त यांचे जर महापालिकेत मन रमत नसेल तर ते आरोग्य विभागाला न्याय काय देणार आणि मुंबईकरांचे आरोग्य कसे योग्य राखणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community