-
विशेष प्रतिनिधी,मुंबई
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे (Dr. Sudhakar Shinde) यांना शासनाने पुन्हा त्यांच्या महसूल विभागात पाठवल्याने त्यांच्याकडील सर्व खाते आणि विभागांचा भार महापालिका आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी तिन्ही अतिरिक्त आयुक्तांकडे विभागून सोपवला आहे. विशेष म्हणजे अतिरिक्त आयुक्तपदी नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती होईपर्यंत या पश्चिम उपनगरे विभागाचा पदभार एकाच अधिकाऱ्याकडे सोपवण्यासाठी तिन्ही अतिरिक्त आयुक्तांकडे विभागून दिला आहे. त्यातच आरोग्य विभागाची जबाबदारी ही अनुभवी डॉ अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्याकडे सोपवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त(प्रकल्प) अभिजित बांगर यांच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे आयुक्तांनी शिंदे यांच्याकडील खात्यांची विभागणी करून तिन्ही अधिकाऱ्यांकडे याची जबाबदारी सोपवून नक्की काय साधले असा प्रश्न उपस्थित होत आहे. (BMC)
मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर प्रतिनियुक्तीवर आलेल्या डॉ सुधाकर शिंदे (Dr. Sudhakar Shinde) यांना त्यांच्या मूळ जागी पुन्हा पाठवण्याचे आदेश जारी झाल्याने, बुधवारी ३१ जुलै रोजी त्यांनी आपल्याकडील सर्व विभाग आणि खात्यांचा भार आयुक्तांकडे सोपवला. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त डॉ शिंदे यांच्याकडील पश्चिम उपनगरेचा पदभार एकाच अतिरिक्त आयुक्तांकडे तात्पुरत्या स्वरुपात सोपवण्यासाठी विद्यमान तिन्ही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपवला. (BMC)
(हेही वाचा- MP Tiger: दोन आठवड्यांपूर्वी रेल्वेने धडक दिलेल्या वाघिणीचा उपचारादरम्यान मृत्यू )
डॉ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन, मालमत्ता विभाग, आपत्कालिन व्यवस्थापन विभाग, सुधार, नियोजन विभाग, लाडकी बहिण योजना, जंबो कोविड सेंटर, डम्पिंग ग्राऊंड प्रकल्प, बाजार, गटविमा तसेच पश्चिम उपनगरातील परिमंडळ ३, ४ आणि ७ची जबाबदारी होती. त्यातील डॉ अश्विनी जोशी यांच्याकडे आपत्कालिन व्यवस्थापन आराखडा, ऑनलाई तक्रार व्यवस्थापन प्रणाली, गटविमा आदींची जबाबदारी सोपवली आहे. (BMC)
तर अतिरिक्त आयुक्त प्रकल्प अभिजित बांगर यांच्याकडे आरोग्य खाते, सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय शिक्षण, जंबो कोविड सेंटर, घनकचरा व्यवस्थापन, डम्पिंग ग्राऊंड प्रकल्प, नियोजन विभाग, बाजार, लाडकी बहिण योजनेचे समन्वय आदींची जबाबदारी सोपवली आहे, तर अतिरिक्त आयुक्त डॉ अमित सैनी यांच्याकडे मालमत्ता खाते, सुधार आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे वाटप आदींची जबाबदारी सोपवली आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत अशाप्रकारे तिन्ही अतिरिक्त आयुक्तांकडे तात्पुरत्या स्वरुपात एवढ्या व्यापक स्वरुपात जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती. (BMC)
(हेही वाचा- Kedarnath Cloudburst: केदारनाथमध्ये ढगफुटी, २०० भाविक अडकले)
महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागची धुरा यापूर्वी अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांनी सांभाळली हाती, त्यांना या विभागाचा चांगला अनुभव आहे. मात्र, आरोग्य विभागाची जबाबदारी या अनुभवी अधिकाऱ्याकडे न देता बांगर यांच्याकडे दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी डॉ जोशी यांना सत्तेत असताना शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रचंड मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. जोशी यांच्याकडे आरोग्य विभाग सोपवला असता तर त्यांना या विभागात शिस्त आणता आली असती. परंतु, जोशी यांच्याकडे आरोग्य विभागाची जबाबदारी सोपवू नये यासाठी कुणी आयुक्तांवर दबाव आणला याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. त्यामुळे महापालिकेत चांगल्याप्रकारे काम करणाऱ्या अधिकाऱ्याची गरज आहे की फक्त निविदा राबवणारेच अधिकारी हवेत अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. डॉ जोशी या महापालिकेत वरिष्ठ अधिकारी असून त्यांना प्रकल्प विभागाची जबाबदारी सोपवली जात नसेल तर पश्चिम उपनगरे विभागाची जबाबदारी सोपवायला हवी. परंतु भविष्यात अतिरिक्त आयुक्तपदी नवीन अधिकाऱ्याची वर्णी लागल्यानंतरही डॉ जोशी यांच्याकडे पश्चिम उपनगरेचा पदभार न सोपवल्यास सरकारमधील पक्षाची जोशी यांना ऍलर्जी आहे असा संदेश पसरायला वेळ लागणार नाही,अशी कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा ऐकायला मिळत आहे. (BMC)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community