BMC : पालकमंत्र्यांनाच पडला नागरिक तक्रार निवारण कक्षाचा विसर

610
Clerk Recruitment : महापालिकेत १८४६ कार्यकारी सहायक पदांच्या जागांसाठी १,११,३५८ अर्ज

मुंबईच्या शहर आणि उपनगरच्या पालकमंत्र्यांनी महापालिका मुख्यालयात नागरिक तक्रार निवारण कक्षच्या नावावर सर्व विरोध असताना हट्टाने कार्यालय उपलब्ध करून घेतल्यानंतर सध्या निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतरही जनतेला या पालकमंत्र्यांचे दर्शन घडलेले नाही. नगरसेवक नसल्याने निवडणुकीपूर्वी लोकांचे प्रश्न जाणून घेत त्यांच्या समस्याचे निवारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्र्यांनी निवडणूक आचारसंहिता तसेच विधीमंडळ अधिवेशन संपल्यानंतरही या दोन्ही पालकमंत्र्यांनी अद्यापही हजेरी लावली नसून लोकसभा निवडणुकीनंतर या दोन्ही पालकमंत्र्यांना मुंबईकरांच्या प्रश्न सोडवावेत असे वाटत नाही का असा सवाल आता उपस्थित होत आहे. (BMC)

मुंबईच्या शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सध्या महापालिकेत प्रशासक नियुक्त असल्याने तसेच नगरसेवक नसल्याने जनतेला आपले प्रश्न मांडता यावेत याकरता मुख्यालय इमारतीत नागरिक तक्रार निवारण कक्षाची स्थापना केली आहे. मुख्यालयाच्या जुन्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर बाजार व व उद्यान समिती अध्यक्षांच्या दालनात उपनगर पालकमंत्री लोढा यांच्यासाठी दालन उपलब्ध करून दिले आहे, तर सभागृहनेत्यांच्या दालनात शहराचे पालकमंत्री केसरकर यांच्यासाठी कार्यालय उपलब्ध करून दिले आहे. लोढा यांना २० जुलै २०२३ मध्ये कार्यालय उपलब्ध करून दिले आणि त्यानंतर केसरकर यांनीही कार्यालयाची मागणी केल्यानंतर त्यांनाही तिथेच दालन उपलब्ध करून देण्यात आली. (BMC)

(हेही वाचा – India Tour of Sri Lanka : टी-२० साठी सूर्यकुमार यादवच कर्णधार; रोहित, विराट एकदिवसीय मालिका खेळणार)

नागरिकांचे प्रश्न सोडवणार कोण?

त्यामुळे मुंबई शहर भागातील विविध प्रश्नांबाबतचा आढावा दर बुधवारी शहराचे पालकमंत्री केसरकर यांच्यावतीने घेतला जात होता, तर उपनगराचे पालकमंत्री यांच्याकडून तक्रार निवारण कक्षात प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नासोबतच इतर नागरी समस्या आणि प्रश्न याबाबतही प्रशासनासोबत पाठपुरावा करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून ही दोन्ही कार्यालये आता ओस पडू लागली असून निवडणूक आचारसंहितेमुळे कार्यालयाचा वापर न करणारे पालकमंत्री आचारसंहिता संपून दीड महिन आणि त्यानंतर विधीमंडळ अधिवेशन संपून आठ दिवस उलटत आले तरी महापालिका मुख्यालयात आपण तक्रार निवारण कक्ष स्थापन केले याचे विसर पडल्याने याठिकाणी फिरकलेच दिसले नाही. (BMC)

नगरसेवक नसल्याने जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी कार्यालय मागून घेणारे लोढा आणि केसरकर यांना या कार्यालयातच फिरकावे असे वाटत नाही. त्यामुळे जनतेचे सर्व प्रश्न सुटले का असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्यासाठी कार्यालय आणि कर्मचारी वर्ग मागवून घेणारे दोन्ही पालकमंत्री आपल्या कार्यालयातच उपलब्ध होत नसल्याने जनतेने आपल्या समस्या या कक्षात मांडले तरी त्या सोडवणार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.