BMC : मुंबईतील पब्स, बार, रेस्टॉरंटमधील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा चालणार!

1738
BMC : मुंबईतील पब्स, बार, रेस्टॉरंटमधील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा चालणार!

मुंबईतील पब्स, बार, रेस्टॉरंट यांच्याविरोधातही धडक कारवाई केली जाणार आहे. पब्स, बार यांनी अनधिकृतपणे केलेली बांधकामे हटवण्याची कार्यवाही महानगरपालिका प्रशासनाने करावी. या आस्थापनांचा खाद्य परवाना निलंबित करावा, अशी सूचना मुंबई पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली. (BMC)

मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईविषयी आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका प्रशासन आणि मुंबई पोलीस यांची संयुक्त बैठक गुरुवारी २७ जून २०२४ रोजी महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात पार पडली. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, सहआयुक्त (दक्षता) डॉ. गंगाथरण डी, पोलीस सहआयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे, अप्पर पोलीस आयुक्त (मुंबई पूर्व विभाग) डॉ. महेश पाटील, उप आयुक्त अभिनव देशमुख यांच्यासह महानगरपालिकेचे परिमंडळ उप आयुक्त, पोलीस उप आयुक्त, सहायक आयुक्त आदी उपस्थित होते. (BMC)

(हेही वाचा – Banganga Lake Damage : कंत्राटदाराविरोधात कडक कारवाई करण्याच्या महानगरपालिका आयुक्तांच्या सूचना)

या बैठकीमध्ये बोलतांना मुंबई पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी म्हणाले की, अतिक्रमण निर्मुलन कारवाईप्रसंगी सुयोग्य पोलीस बंदोबस्त पुरविला जाईल. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. फेरीवाले माफीया यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील अशाप्रकारचे आश्वासन महापालिका प्रशासनाला केल्या. त्याचबरोबर मुंबईतील पब्स, बार, रेस्टॉरंट यांच्याविरोधातही धडक कारवाई केली जाणार आहे. पब्स, बार यांनी अनधिकृतपणे केलेली बांधकामे निष्कासित करण्याची कार्यवाही महानगरपालिका प्रशासनाने करावी. या आस्थापनांचा खाद्य परवाना निलंबित करावा, अशीही सूचना चौधरी यांनी केली. महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण निर्मुलन कारवाई केली जाणार असून या मोहिमेस मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त गगराणी यांनी यावेळी केले आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.