मुंबई महापालिकेत (BMC) प्रतिनियुक्तीवर आलेल्या अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना त्यांच्या मूळ जागेवर परत पाठवल्याने रिक्त झालेल्या या जागेवर कुणाची वर्णी लागणार याबाबत तर्क लढवले जात आहे. तसेच या पदावर वर्णी लावण्यासाठी अनेक सनदी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे स्वामी, नार्वेकर, शर्मा, सक्सेना आदींची नावे चर्चेत असली तरी शिंदे यांच्या जागीच डॉ. विपीन शर्मा यांची नियुक्ती केली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात असली मागील दोन अनुभव विचारात प्रत्यक्षात या रिक्त पदी किती दिवसांनी नियुक्ती केली जाईल याबाबतच सर्वांना उत्सुकता आहे.
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली त्यांच्या मुळ खात्यात झाल्यामुळे महापालिकेतील (BMC) हे पद रिक्त झाले आहे. परंतु रिक्त पद पुढील काही दिवसांमध्ये भरले जाणार नाही याच विचाराने महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी शिंदे यांच्याकडे विविध खाते व विभाग हे तीन अतिरिक्त आयुक्तांमध्ये विभागणी करून त्यांच्याकडे सोपवले आहे. त्यामुळे महापालिकेत प्रथमच बदली झालेल्या एका अतिरिक्त आयुक्तांकडील विभाग व खात्यांचा एकत्र पदभार एकाच अतिरिक्त आयुक्ताकडे सोपवण्यासाठी ऐवजी त्यांची विभागणी करून सोपवली आहे.
(हेही वाचा – Sarvajanik Ganeshotsav : मंडळांच्या मंडप परवानगीबाबत समन्वय समिती नाखूश)
यापूर्वी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची ३० एप्रिल २०२२ रोजी सेवा निवृत झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी २४ मे २०२२ रोजी आशिष शर्मा यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. म्हणजे तब्बल २५ ते २६ दिवसांनी हे पद भरले गेले. तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पदी असणारे श्रावण हर्डीकर यांच्या बदलीनंतर तब्बल ४५ दिवसांनी हे पद भरले गेले. तब्बल दीड महिन्यांनी हर्डीकर यांच्या रिक्त जागी अतिरिक्त आयुक्त म्हणून १४ सप्टेंबर २०२३ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेत (BMC) अतिरिक्त आयुक्तांच्या बदलीनंतर हे पद अनेक दिवस रिक्त राहत असल्याने तसेच या पदावर त्वरित नियुक्ती होत नसल्याने आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्याकडील खात्यांची विभागणी अन्य अतिरिक्त आयुक्तांकडे करून दिली आहे. महापालिकेत यापूर्वी एखाद्या अतिरिक्त आयुक्तांच्या बदलीने रिक्त होणारे पद एक दिवसांपेक्षा कधीच रिक्त राहिलेले नसून हे पद रिक्त झाल्यानंतर त्वरित याठिकाणी अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली आहे. परंतु महापालिकेच्या इतिहासात प्रथमच दोन वेळा अतिरिक्त आयुक्तांची पदे भरण्यास अनेक दिवसांचा कालावाधी लागल होता.
मुंबई महापालिकेतील या रिक्त अतिरिक्त आयुक्त पदी वर्णी लावण्यासाठी सनदी अधिकारी स्वामी, सक्सेना, नार्वेकर आणि डॉ विपीन शर्मा यांच्या नावाची चर्चा असून डॉ. शर्मा यांच्या नावाची हवा अधिक जोरात वाहत आहे. डॉ. विपीन शर्मा हे भारतीय प्रशासकीय सेवेतील २००५ च्या केडरचे असून सध्या ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. डॉ. शर्मा यांची बदली झाल्यास तेथील रिक्त पदावर पी वेलारासू यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. डॉ. विपीन शर्मा यांनी यापूर्वी पुणे आणि ठाणे महानगरपालिकेत आयुक्त म्हणून काम केले आहे. त्यामुळे नागरिकांच्या कामांचा अनुभव विचारात घेता त्यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community