मुंबईत क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम

मुंबईतील क्षयरोग आणि कुष्ठरोगाच्या नव्या रुग्णांना शोधण्यासाठी मुंबईत पालिकेने शोधमोहिम हाती घेतली आहे. २६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान ही मोहीम घेतली जाईल. आठवड्याभरात मुंबईतील ९ लाख ८६ हजार घरांना पालिका अधिकारी भेट देतील.

( हेही वाचा : गटप्रमुखांचा मेळावा : इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीने शिवसैनिक नाराज)

या मोहिमेसाठी पालिकेचे २ हजार ८२९ कर्मचारी नियुक्त केल्याची माहिती पालिकेच्यावतीने दिली गेली. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत पालिका अधिकारी घरांना भेट देऊन रुग्णांची माहिती घेणार आहे. घरातील एखादा सदस्य गैरहजर असल्यास पालिका अधिकारी पुन्हा घराला भेट देतील. संशयित क्षयरोग रुग्णांच्या थुंकीची तपासणी केली जाईल, रुग्णांची एक्स रे तपासणी पालिका केंद्रात मोफत होईल. कुष्ठरोगाच्या संशयित रुग्णांना पुढील तपासासाठी पालिका रुग्णालयातील वैद्यकीय अधिका-यांकडे तपासणीकरिता पाठवले जाईल.

क्षयरोगाची लक्षणे ओळखा –

  • दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, सायंकाळी ताप येणे
  • खोकताना कफ आल्यास रक्त येणे, छातीत दुखणे
  • मानेवर सूज येणे

कुष्ठरोगाची लक्षणे ओळखा –

  • कानाच्या पाळ्या जाड होणे
  • भुवयांचे केस विरळ असणे
  • हाता-पायाची बोटे वाकडी असणे, हातापायांत अशक्तपणा जाणवणे
  • हातातून वस्तू गळून पडणे, चालताना पायातून चप्पल निघणे
  • त्वचेवर फिकट, लालसर बधीर चट्टा येणे, त्या ठिकाणी घाम न येणे

कुष्ठरोग आणि क्षयरोग पूर्णपणे बरे होतात. कुष्ठरोग आणि क्षयरोगाची लक्षणे आढळलेल्या रुग्णांनी पालिका आणि सरकारी रुग्णालयात तातडीने उपचार घ्यायला सुरुवात केली.
डॉ मंगला गोमारे, आरोग्य अधिकारी, पालिका आरोग्य विभाग

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here