आगामी काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता, मुंबई महापालिकेच्यावतीने छोट्या बालकांसाठी आवश्यक असणाऱ्या पेडियाट्रीक कम निओनॅटल व्हेंटीलेटरची खरेदी केली जात आहे. महापालिकेच्या रुग्णालयांसाठी, तसेच उपनगरीय रुग्णालयांसाठी ३३ व्हेंटीलेटर्स खरेदी करण्यात येत आहेत.
शेवटच्या टप्प्यात खरेदी
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले आणि झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना संसर्गाचा धोका जास्त असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने छोट्या मुलांसाठी कोविड सेंटरमध्ये रुग्ण खाटा तयार केल्या आहेत. याशिवाय ज्या जंबो कोविड सेंटरमध्ये लहान मुलांची व्यवस्था केली जाणार आहे, त्यासाठीच्या पायाभूत सुविधा तसेच निओनॅटल व्हेंटीलेटरची खरेदी शेवटच्या टप्प्यात आहे.
(हेही वाचाः तिस-या लाटेसाठी राज्य सरकार सज्ज! लहान मुलांच्या बचावासाठी घेतला ‘हा’ निर्णय)
अर्जेंटिनातील व्हेंटीलेटर
महापालिकेच्या रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागात वापरण्यात येणाऱ्या निओनॅटल व्हेंटीलेटरची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची पहिली लाट येण्यापूर्वी ३३ निओनॅटल व्हंटीलेटरची खरेदी करण्याची प्रक्रिया राबवण्यात आाली होती. परंतु कोविडमुळे याच्या खरेदीची प्रक्रिया थांबली. अखेर तीन प्रमुख रुग्णालये अणि ११ उपनगरीय रुग्णालयांसाठी याची खरेदी करण्यात येणार आहे. हे निओनॅटल व्हेंटीलेटर अर्जेंटिनातील उत्पादित कंपनीचे आहेत.
अशी होणार खरेदी
केईएम रुग्णालय : ०३
शीव रुग्णालय : १३
नायर रुग्णालय : ०६
उपनगरीय रुग्णालये व प्रसुतीगृह : ११
(हेही वाचाः नेस्को कोविड केंद्रात लहान मुलांसाठीही रुग्णखाटा)
Join Our WhatsApp Community