फेरीवाला मुक्तनंतर आता छत्रपती शिवाजी महाराज मैदान अतिक्रमण मुक्त

छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसर फेरीवालामुक्त करण्यात आल्यानंतर या मैदान परिसरातील अतिक्रमणेही महापालिकेच्या जी उत्तर विभागाने साफ केली. शिवाजी पार्क जिमखाना, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशन आणि स्काऊट गाईड हॉलच्या शेजारील अतिक्रमणांवर महापालिकेने मंगळवारी धडक कारवाई केली. त्यामुळे शिवाजीपार्क मधील नागरिकांकडून समाधान व्यक्त करत महापालिकेचे विशेष आभार मानले आहे.

( हेही वाचा : महापालिकेच्या विधी विभागातील या ५३ पदांची लवकरच भरती : लवकरच प्रसिध्द होणार जाहिरात)

दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवाजी पार्क परिसरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे करण्यात आली होती. याबाबत स्थानिकांकडून वारंवार तक्रारी येत असल्याने अखेर परिमंडळ दोनचे उपायुक्त रमाकांत बिरादर यांच्या मार्गदर्शनाखाली जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे आणि त्यांच्या चमुने शिवाजी पार्कमधील या अतिक्रमणांवर कारवाई करत या अतिक्रमणांचा विळखा मोकळा केला. यामध्ये स्काऊट अँड गाईड येथे रोपवाटिकेच्या नावावर जागांवर अतिक्रमण करण्यात आले होते. या रोप वाटिकांवर कारवाई करून स्काऊट अँड गाईड समोरील भाग मोकळा करण्यात आला आहे.

शिवाजी पार्क जिमखान्याच्या जागेवरील लोखंडाचा वापर करून बांधलेले अनधिकृत बांधकाम तसेच मोकळ्या जागेवरील शेजारील नेट आदी हटवण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनसमोरील लोखंडी ग्रिल व नेट व त्याच्या मागील व पुढील बाजुस बांधलेले बांबू व ताडपत्रीचे बांधकाम तसेच याठिकाणीच असलेले दगड विटांचे बांधकाम व ओट्याचे अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले.

शिवाजी पार्कमधील या भागातील अतिक्रमणांवर झाली कारवाई

  • एम.एस.चा वापर करून अनधिकृत बांधकाम कंपाउंड वॉल. शिवाजी पार्क जिमखान्याच्या मोकळ्या जागेच्या शेजारील नेट आणि अँगल.
  • एम. एस.वापरून कंपाउंड वॉलचे अनधिकृत बांधकाम. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन समोर नेट आणि कोन.
  • महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पुढील व मागील बाजूस बांबू व ताडपत्री वापरून शेडचे अनधिकृत बांधकाम.
  • महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या दक्षिण बाजूला विटांचे दगडी बांधकाम आणि लादी कोबा वापरून केलेल्या ओट्याचे अनधिकृत बांधकाम
  • रोपांच्या रोपवाटिकेसाठी वापरल्या जाणार्‍या स्काऊट गाईड हॉलसमोरील अनधिकृत शेड
  • स्काऊट गाईड हॉलच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवर लाकडी बांबू आणि ताडपत्री वापरून केलेली अनधिकृत शेड

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here