BMC : महापालिकेचे सात पैकी दोन सहायक आयुक्त २६ जानेवारीनंतर होणार सेवेत रुजू

69
BMC : महापालिकेचे सात पैकी दोन सहायक आयुक्त २६ जानेवारीनंतर होणार सेवेत रुजू
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेतील सहायक आयुक्तांच्या रिक्त जागेवर नियुक्त करण्यात येणाऱ्या सात जागांपैकी दोन जागा या येत्या दहा दिवसांमध्ये भरण्यात येणार आहे. येत्या २७ जानेवारीपर्यंत दोन सहायक आयुक्त हे महापालिकेतील प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून प्रत्यक्षात या पदावर रुजू होणार आहेत. नितीन शुक्ला आणि कुंदन वळवी असे या दोन सहायक आयुक्तांची नावे असून प्रथम हे दोन अधिकारी रुजू झाल्यानंतर पुढील महिना भरात उर्वरीत पाच सहायक आयुक्त हे महापालिकेच्या सेवेत रुजू होणार आहेत. (BMC)

मुंबई महापालिकेतील चार सहायक आयुक्तांना उपायुक्त पदी बढती देण्यात आल्यानंतर त्यांच्याकडे आजही सहायक आयुक्तपदाचा पदभार कायम ठेवण्यात आला आहे. उपायुक्तपदासह सहायक आयुक्त आणि इतर खात्यांचा भार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे किरण दिघावकर, विश्वास मोटे, शरद उघडे आणि संतोष धोंडे यांच्याकडे उपायुक्तपदासह सहायक आयुक्त तसेच इतर खात्यांचा प्रभारी भार सोपवण्यात आला आहे. सहायक आयुक्तांनी अनेक पदे रिक्त असल्याने उपायुक्तपदी बढती मिळाल्यानंतरही चार सहायक आयुक्तांकडील पदभार कायम ठेवण्यात आला आहे, तसेच इतर सहायक आयुक्तांची बढतीही रोखण्यात आली आहे. त्यामुळे सहायक आयुक्तांच्या जागा तातडीने भरणे आवश्यक बनले आहे. (BMC)

(हेही वाचा – Delhi Assembly Election : मोठ्या पक्षांसाठी लहान पक्ष डोकेदुखी ठरणार)

मुंबई महापालिकेने एप्रिल २०२१मध्ये सहायक आयुक्तांची १६ रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवेने भरण्यासाठी मागणी केली होती. त्याअनुषंगाने लोकसेवा आयोगाने ऑक्टोबर २०२४ रोजी महापालिकेला सहायक आयुक्त पदावरील नियुक्तीसाठी गुणवत्तेच्या आधारे सात उमेदवारांची शिफारस केली. त्यातील सर्व प्रथम कागदपत्रांची पुतर्ता करणाऱ्या महापालिकेच्या सेवेतच असणाऱ्या नितीन शुक्ला आणि कुंदन वळवी यांच्याकडून झाल्यानंतर पुढील प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर येत्या २७ जानेवारीला सहायक आयुक्तपदी नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. (BMC)

तर उर्वरीत दिनेश पल्लेवाड, अरुण क्षिरसागर, उज्ज्वल इंगोले, योगिता कोल्हे आणि योगेश देसाई यांनी आवश्यक कागदपत्रे उशिराने सादर केल्याने त्यांचे प्रशिक्षण उशिराने सुरु झाल्याने येत्या महिन्याभरात यांचीही सहायक आयुक्तपदी नियुक्ती केले जाणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकायांकडून मिळाली आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.