-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्यावतीने रिक्त भूभाग भाडेपट्ट्याने देण्याच्या घोषणा महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी केल्यानंतर या धोरणाला सुधार समितीसह महापालिकेची मंजुरीही प्राप्त झाल्याने आता याच्या प्रत्यक्षात अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता मुंबईतील ३४७२ भूभाग आता भाडेपट्ट्याखाली आणून त्यांचे नव्याने या धोरणानुसार भाडेकरार करता येणार आहे. या धोरणाच्या जमिनीच्या विकास शक्य होणार असल्याने महापालिकेला एक वेळ अधिमुल्य व भूभाडे स्वरुपात सुमारे २ हजार कोटी रुपयांची रक्कम आगामी वर्षांत प्राप्त होईल असा विश्वास आहे. (BMC)
मुंबई सुधार मंडळाने १९३३ मध्ये विलिन होण्यापूर्वी मुंबईतील सुमारे १२५० भूभाग भाडेकरारावर वितरीत केले होते. सन १९३३ पूर्वी आणि त्यानंतर मिळून एकूण ४१७७ भूभाग विविध वापराकरता भाडेकरारावर वितरीत करण्यात आले होते. परंतु त्यातील बरेचशे भूखंड भाडेकरारावर वितरीत करूनही महापालिकेकडे काही भूभाग उपलब्ध होते. भविष्यातील निकड लक्षात ठेवूनव मोकळ्या भूभागांना अतिक्रमणांपासून संरक्षित ठेवण्यासाठी असे रिक्त भूखंड पर्यायी जागा न देता महापालिका ताब्यात घेईल, या अटीवर तात्पुरत्या वापरासाठी वितरीत करण्याच्या उद्देशाने रिक्त भूभाग भाडेराकराच्या नावाने देण्याची पध्दत अंमलात आली आहे. (BMC)
(हेही वाचा – Konkan Railway: होळीनिमित्त कोकणातील चाकरमान्यांसाठी रेल्वे सोडणार विशेष गाड्या)
जेव्हा विकास आराखडा सन १९६७ मध्ये प्रथमत: मंजूर झाला तेव्हा मार्गदर्शक तत्वे उपलब्ध झाल्याने रिक्त भूभाग भाडेपट्टे देणे थांबवण्यात आले. त्यानंतर महापालिकेने सन १९७१मध्ये रिक्त भूभाग भाडेपट्टा कराराने देण्याचे बंद करण्याचा निर्णय घेतला. परंतु महापालिकेच्या दत्परी असलेल्या नोंदीनुसार रिक्त भूभाग भाडेपट्टे सन १९९३ पर्यंत देण्यात आले होते. महापालिकेचया मोकळ्या जागांचे अतिक्रमणांपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने तसेच विकास आराखडा अंमलात येईपर्यंत व विहित मार्गदर्शक तत्वे उपलब्ध नसल्यामुळे एकूण ३४७२ रिक्त भूभाग भाडेपट्टे खासगी व्यक्तींना देण्यात आलेले आहेत. रिक्त भूभाग भाडेपट्टा करारातील महत्त्वाची तरतूद म्हणजे महापालिकेला आवश्यक असल्यास असे भाडेपट्टे १५ दिवसांची सूचना देऊन रद्द करता येतील व महापालिकेला असे भूभाग ताब्यात घेता येतील. आतापर्यंत या भूभागांचा विकास करण्याचे कायदेशीर अधिकार नव्हते. त्यामुळे महापालिकेने यासाठी आता धोरण बनवले असून आयुक्तांच प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर प्रशासकांचीही आता याला मंजुरी मिळाल्याने आता महापालिकेला या रिक्त भूभाग भाडेपट्ट्यांवर दिलेले आहेत, ते भूखंड ताब्यात घेऊन नव्याने भाडेकरार करण्याची अंमलबजावणी सुरु होईल. (BMC)
रिक्त भूभाग भाडेपट्ट्यांच्या एकूण ३४७२ भूभागांपैंकी महापालिकेच्या नोंदीनसुर फक्त ६१० भूभाग असून १२५ चौरस मीटर पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या भूभागांची संख्या ही ३१३२ एवढी आहे. त्यामुळे हे भूभाग भाडेकरावर देण्यासाठी नव्याने धोरण तयार करण्यात आले आहे. हे भूभाग ३० वर्षांच्या कालावधीकरता विविध अटी व शर्तीवर देण्यात येणार आहेत. यासाठी एकवेळ अधिमुल्य अर्थात प्रिमियम आणि वार्षिक भाडेकरारानुसार भूईभाडे आकारले जाणार आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community