BMC Water Tanker Filling Station : मुंबईतील महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रावर आता सीसीटीव्हीची नजर

71
BMC Water Tanker Filling Station : मुंबईतील महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रावर आता सीसीटीव्हीची नजर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

पश्चिम उपनगरांतील विविध टँकर भरणा केंद्रांच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने याठिकाणांहून समाज कंटकांकडून होणारी पाणी चोरी रोखण्याच्या दृष्टीकोनातून कडक पावले उचलली आहेत. यासाठी पश्चिम उपनगरांतील १५ टँकर भरणा केंद्राच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या सीसीटीव्ही कॅमेरांमुळे आता या भरणा केंद्रांवर ये-जा करणाऱ्या टँकर आणि त्यांच्या गाड्यांचा नोंदणी क्रमांकासह चालकांची ओळख पटवणे महापालिका प्रशासनाला शक्य होणार आहे. (BMC Water Tanker Filling Station)

पश्चिम उपनगरांतील काही भागांमध्ये दुषित पाणीपुरवठा तसेच काही भागांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्यास तसे आगीची दुर्घटना घडल्यास त्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा हा येथील प्रत्येक विभागांतील टँकर भरणा केंद्रावरून केला जातो. पश्चिम उपनगरांमध्ये अशाप्रकारे १५ टँकर भरणा केंद्र असून महापालिकेच्या तसेच खासगी टँकरच्या माध्यमातून आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरवठा केला जातो.

(हेही वाचा – ज्ञानराधा क्रेडिट सोसायटीसाठी लिक्विडेटर नेमण्याचे Central Govt चे आदेश)

हे सर्व टँकर भरणा केंद्र हे २४ तास प्रवाहित असलेल्या जलवाहिनीला जोडलेले असून ही भरणा केंद्र रस्त्याच्या बाजूला असल्याने व अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने समाजकंटकांकडून पाणी चोरी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे महापालिकेने या पश्चिम उपनगरांतील विविध टँकर भरणा केंद्रावर सतत देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या जलअभियंता विभागाने १५ टँकर भरणा केंद्रासह अंधेरी पश्चिम आदर्श नगर टनेल, अंधेरी पश्चिम यारी रोड टनेल, अंधेरी पूर्व पवई वेरावली टनेल आणि अंधेरी वेरावली यार्ड आदी ठिकाणच्या जलबोगद्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विविध करांसह १ कोटी ३२ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये विकी एंटरप्रायझेस ही कंपनी पात्र ठरली आहे. (BMC Water Tanker Filling Station)

(हेही वाचा – Disabled Voters : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग मतदारांसाठी हेल्पलाईन सुरु)

पश्चिम उपनगरांतील या टँकर भरणा केंद्रावर बसवणार सीसीटीव्ही कॅमेरे
  • सांताक्रुझ पूर्व शास्त्री नर्सिंग होमच्या बाजुला
  • सांताकुझ पूर्व वाकोला टनेल
  • वांद्रे पश्चिम चावीवाला चौकी
  • अंधेरी पूर्व गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपूलाखाली
  • अंधेरी पूर्व सहार कार्गो
  • अंधेरी पूर्व विजय नगर पुलाखाली
  • अंधेरी पूर्व चकाला केबीन
  • अंधेरी पश्चिम गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाखाली
  • अंधेरी पश्चिम आदर्श नगर टनेल स्टेशन
  • गोरेगाव पश्चिम अहिंसा टँकर भरणा स्टेशन
  • मालाड पश्चिम लिबर्टी उद्यान टनेल
  • कांदिवली पश्चिम पोईसर बस डेपोसमोर
  • बोरीवली पश्चिम चिकूवाडी, लिंकरोड
  • दहिसर पश्चिम चावीवाला चौकी जयवंत सावंत रोड (BMC Water Tanker Filling Station)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.