BMC : महापालिका आयुक्त कोण? चहल की शिंदे?

1719
Mumbai Property Tax : मुंबई मेट्रो रेल्वे कंत्राटदारांकडे मालमत्ता कराची ३२६ कोटींची थकबाकी, पण इतर थकबाकीदारांकडे दुर्लक्ष

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सकाळी कोस्टल रोडसह मुंबईतील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची पाहणी केली. मात्र, मुख्यमंत्री शिंदे हे कोस्टल रोडची पाहणी करणार याची कल्पनाच महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांना नव्हती. अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना कोस्टल रोड प्रकल्पाच्या पाहणीची माहिती होती,त्यामुळे त्यांनी थेट वर्षांवर धाव घेतली, परंतु मुख्यमंत्री निघुन गेल्याने अतिरिक्त आयुक्तांनी आपली गाडी वळवली आणि मुख्यमंत्र्यांना गाठत कोस्टल रोडची पाहणी करून त्या मार्गे वरळी सी फेसपर्यंत पोहोचत वरळी हब येथील आपला दवाखान्याच्या ठिकाणी पोहोचले. मात्र,तोपर्यंत महापालिका आयुक्त चहल हे वरळीला आपला दवाखान्याच्या ठिकाणी ताटकळत उभे राहिले. त्यामुळे महापालिका आयुक्त कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (BMC)

(हेही वाचा- CM Eknath Shinde : मुंबईकरांना आता आरोग्य उपचारावर खर्च करावा लागणार नाही)

मुख्यमंत्र्यांच्या समवेत चहल नव्हते

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाची पाहणी केली. मरीन ड्राईव्ह ते वरळी असा  प्रवास करतांना त्यांनी प्रगतिपथावर असलेल्या कामांची पाहणी केली. तसेच प्रशासनाला योग्य त्या सूचनाही केल्या. मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडची पाहणी करताना महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल त्यांच्यासोबत नव्हते. पण अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे त्यांच्यासोबत होते. (BMC)

अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे वर्षांवर पोहोचले

कोस्टल रोडची पाहणी करणार याची कल्पना आयुक्तांना नव्हती, परंतु डॉ सुधाकर शिंदे यांना होती, त्यामुळे त्यांनी सकाळीच वर्षा निवासस्थान गाठले. परंतु तिथे पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री कोस्टल रोड प्रकल्प पाहणीला निघुन गेल्याची माहिती कळताच शिंदे यांनी आपली गाडी वळवली. आणि नेपियन्सी पार्क जवळील एमआरडीसी ऑफिस कंपाऊंड परिसरात पोहोचलेल्या मुख्यमंत्र्यांना भेटून तिथून त्यांनी कोस्टल रोड प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पाच्या एका मार्गिकेतून प्रवास करतच त्यांनी या प्रकल्पाची पाहणी केली. (BMC)

(हेही वाचा- Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत केंद्राने अध्यादेश काढावा)

मुख्यमंत्र्यांचा विश्वास हा केवळ सुधाकर शिंदे यांच्यावरच

 मात्र, दुसरीकडे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल हे मात्र वरळी हब येथील आपला दवाखाना परिसरात आपल्या गाडीत बसून त्यांची प्रतीक्षा करत बसले होते. (BMC)

महापालिकेचे आयुक्त हे चहल असूनही त्यांना मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोड प्रकल्पाच्या पाहणीमध्ये सोबत घेतले नाही. परंतु या कोस्टल रोड प्रकल्पाच्या पाहणीची माहिती शिंदे यांना होती. त्यामुळे महापालिकेची सुत्रे चहल यांच्या हाती असली तरी मुख्यमंत्र्यांचा विश्वास हा केवळ सुधाकर शिंदे यांच्यावरच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. (BMC)

(हेही वाचा- UCO Bank CBI Raid : युको बँकेत 820 कोटींचा घोटाळा; CBI कडून 67 ठिकाणांवर छापे)

कोस्टल रोड प्रकल्पाची पाहणी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला दवाखाना आणि त्यानंतर वरळी मधील गणपतराव कदम मार्ग, सेठ मोतीलाल सांघी मार्ग आणि त्यानंतर दादर येथील दादासाहेब रेगे मार्ग या तीन ठिकाणी रस्ते काँक्रिटीकरण कामांची पाहणी केली. वरळीपासून पुढे  दादर पर्यंत चहल हे मुख्यमंत्र्यांसमवेत दिसले. परंतु या संपूर्ण दौऱ्यात चहल यांच्यापेक्षा डॉ सुधाकर शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळ दिसले. त्यामुळे महापालिका आयुक्त कोण? चहल कि डॉ  शिंदे असा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात घोळू लागला (BMC)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.