BMC : महापालिकेतील ‘त्या’ ६८ सहायक अभियंत्यांच्या बढतीत कुणाचा अडसर?

271
BMC : महापालिकेतील 'त्या' ६८ सहायक अभियंत्यांच्या बढतीत कुणाचा अडसर?
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबई महापालिकेतील (BMC) कनिष्ठ अभियंतापासून ते कार्यकारी अभियंता पर्यंतचे अनेक अभियंते आज पदोन्नतीपासून वंचित असून मागील काही महिन्यांपासून पदोन्नतीसाठी पात्र ठरवूनही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे आज सर्व प्रवर्गातील सुमारे २५० ते ३५० अभियंत्यांची पदे रिक्त आहेत. आज पदोन्नतीने आणि थेट सहायक अभियंता पदी बढती मिळालेल्या अभियंत्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित असून यातील वादातच कार्यकारी अभियंतापदाची बढती रखडलेली रखडलेली आहे. मात्र, सहायक अभियंता पदी थेट नियुक्ती होण्यापूर्वी ज्या ६८ अभियंत्यांना सहायक अभियंता म्हणून बढती मिळाली होती, त्यांचीही बढती प्रशासनाने रोखून धरल्याने कार्यकारी अभियंत्यांच्या अनेक पदे रिक्त आहे. त्यामुळे प्रशासन या ६८ सहायक अभियंत्यांना तरी कार्यकारी अभियंता म्हणून बढती देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. (BMC)

मुंबई महापालिकेच्या (BMC) विविध विभागांमध्ये कार्यरत कनिष्ठ अभियंता, दुय्यम अभियंता, सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता आदी पदांवर कार्यरत असलेले अभियंते हे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. मागील अनेक वर्षांपासून कार्यतर असलेले पात्र कनिष्ठ अभिंयता हे दुय्यम अभियंता पदावरील पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहे, तर दुय्यम अभियंता हे सहायक अभियंता आणि सहायक अभियंता हे कार्यकारी अभियंता आणि कार्यकारी अभिंयता हे उपप्रमुख अभियंता या पदावर पदोन्नतीसाठी पात्र ठरवूनही त्यांना पदोन्नतीचा लाभ दिला जात नाही. परिणामी आज अभियंत्यांची अनेक पदे रिक्त असून त्यामुळे अनेक अभियंत्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. परिणामी अनेक प्रकल्प कामे तसेच विकासकामे यांना विलंब होत आहे. या सर्व अभियंत्यांना लोकसभा निवडणू आचारसंहितेपूर्वी पदोन्नती मिळणे आवश्यक होते, परंतु लोकसभा आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागून संपुष्टात आल्यानंतरही पात्र अभियंत्यांना कोणत्याही प्रकारचा पदोन्नतीचा लाभ देण्यासाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. (BMC)

(हेही वाचा – मुले जर आई-वडिलांचा सांभाळ करण्यास अपयशी ठरले, तर हस्तांतर केलेली मालमत्ता परत घेऊ शकतात; Madras High Court चे निरीक्षण)

दोनच दिवसांपूर्वी शिवसेने उबाठाचे आमदार सुनील प्रभू यांनी मुंबई महापालिकेतील सहायक अभियंता पदावरून कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती मंजूर झालेल्या तथा बढती मिळालेल्या, परंतु त्यांना त्यांच्या अद्यापही ऑर्डर न काढल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे कार्यकारी अभियंता पदी पात्र होवूनही तथा बढती मिळूनही आजवर या ऑर्डर न काढता पदोन्नतीचा लाभ दिला जात नसल्याचे बोलले जात आहे. (BMC)

मुंबई महापालिकेने काही वर्षांपूर्वी सहायक अभियंतापदी थेट भरती केली होती, तसेच पदोन्नतीने सहायक अभियंतापदी नियुक्त झालेल्या अभियंत्यांमध्ये सेवा ज्येष्ठतेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. यांच्या वादात कार्यकारी अभियंता पदी बढती मिळण्याचा मार्ग रखडला आहे. त्यामुळे या दोन्ही संवर्गातील अभियंत्यांची सामाईक सेवा ज्येष्ठता यादी तयार करून यावर मार्ग काढणे आवश्यक असतानाही हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. विशेष म्हणजे सहायक अभियंतापदी थेट नियुक्ती होण्यापूर्वी ६८ अभियंत्यांना सहायक अभियंता पदी बढती मिळाली होती. त्यामुळे ६८ सहायक अभियंतापदी असलेल्या अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदी बढती देण्यास कोणत्याही प्रकारची हरकत नसूनही प्रशासन यावर अडून बसले आहे. (BMC)

(हेही वाचा – तांडा, वाडी-वस्त्यांवरील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची प्रथमच Legislature ला भेट)

नगर अभियंता विभागाच्या आस्थापनावर कोणाचाही अंकुश नसल्याने असे प्रकार होत असून सहायक अभियंता ते कार्यकारी अभियंता या पदावरील पदोन्नतीचा वाद असून प्रशासन स्तरावर हा तिढा सोडवणे आवश्यक आहे, पण प्रशासन त्यासाठी प्रयत्न करताना दिसत नसल्याने हा प्रश्न प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. कनिष्ठ अभियंत्यांची १०० टक्के पदे बाहेरुन भरली जात असून या भरतीची जाहिरात दिली आहे, तसेच सहायक अभियंता पदावरील ५० टक्के पदे ही अंतर्गत अभियंत्यांच्या पदोन्नतीतून आणि उर्वरीत ५० टक्के बाहेरुन जाहिरात देवून भरली जातात. त्यामुळे या पदोन्नती आणि रिक्तपदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरु असल्याचे नगरअभियंता महेंद्र उबाळे हे वारंवार सांगत असले तरी आज तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही यावर नगरअभियंता विभागाला आणि या विभागाचा कार्यभार असलेल्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगर) यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रयत्न तथा पुढाकार घेताना दिसत नाही. परिणामी अनेक अभियंत्यांवर अतिरिक्त कामांचा बोजा पडत असून अनेक अभियंत्यांच्या बदल्याही या कारणांमुळे होत नाही, असे चित्र सध्या दिसून येत आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.