भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मुंबईत १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत खरेदी करण्यात येणाऱ्या ध्वजांच्या तुलनेत २ लाख ध्वज प्राप्त झाले असून प्रत्येक विभाग कार्यालयांना २५ हजार तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात येत आहे. तर उर्वरीत ४ लाख ध्वज उपलब्ध होणार असून त्यानुसार प्रत्येक विभाग कार्यालयाला आणखी ५० हजार ध्वजांचे वाटप केले जाणार आहे. या एका ध्वजाच्या खरेदीसाठी महापालिका १८ रुपये २५ पैसे मोजत असून काठीसह ध्वज मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे.
( हेही वाचा : …तर २०१७च्या निवडणुकीप्रमाणे २२७ प्रभागांचे आरक्षण राहिल कायम?)
‘हर घर तिरंगा’ अभियान राबविणार
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार,मुंबई महापालिका ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविणार आहे. त्यासाठी पालिका ७ कोटी रुपये खर्चून ५० लाख तिरंगा ध्वज मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिकेने ३५ लाख ध्वज खरेदीची प्रक्रीया राबवली आहे. या खरेदी आदेशातील ३५ लाख ध्वजांच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात २ लाख ध्वज प्राप्त झाले आहे, त्यानुसार महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांना प्रत्येकी २५ हजार ध्वज वाटप करण्याची प्रक्रीया सुरु केली असल्याची माहिती विभागाकडून मिळत आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ४ लाख ध्वज त्वरीत प्राप्त होणार आहे. हे ध्वज पॉलिस्टर कपड्याचे असून १५ ऑगस्टनंतर हे सर्व ध्वज प्रत्येक नागरिकांनी काढून सुरक्षित घडी करून आपल्याच घरी ठेवावा,असेही आवाहन केले जात आहे.
ध्वजांचे वाटप घरोघरी
मुंबई महापालिकेने २ ऑगस्टपासून ते आजपर्यंत विविध ठिकाणी २ लाख ध्वजांचे मोफत वाटप केले जात असून दुसऱ्या टप्प्यात ४ लाख ध्वज प्राप्त झाल्यानंतर त्यांचेही वाटप केले जाणार आहे. त्यानंतर उर्वरीत ध्वज प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक विभाग कार्यालयांना वितरीत करून विविध सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संस्था, आरोग्य सेविका तसेच सफाई कामगारांच्या माध्यमातून या ध्वजांचे वाटप घरोघरी तसेच इमारती आणि सोसायट्यांमध्ये केला जाणार आहे. पुढील दहा दिवसांमध्ये या ध्वजांचे वितरण विभाग कार्यालयांना केले जाणार आहे.
काही ठिकाणी या अभियानाची माहिती देण्यासाठी फ्लॅक्स, होर्डिंग यांचे वाटप करण्यात येत आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान मरीन ड्राईव्ह येथे ‘लेझर शो’ही करण्यात येणार आहे. या कालावधीत प्रत्येकाने आपल्या निवासस्थानाच्या गॅलरीत ,खिडकीत, दरवाजावर हा झेंडा लावायचा आहे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community