महाराष्ट्राने मागच्या काही दिवसांत लसीकरणात उच्चांक गाठला होता. त्यात मुंबईचे लसीकरणे वेगाने सुरु आहे. तज्ज्ञांच्या मते भारताला तिस-या लाटेचा धोका जवळजवळ नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण, आता सगळ्याच गोष्टी अनलॅाक होत असल्याने अतिदक्षता घेण्याची गरज बनली आहे. म्हणूनच मुंबई महानगरपालिकेने काही नागरिक जे कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरु शकतात त्यांचे लसीकरण वेगाने करण्याचा निर्णय घेतला आहे.
या नागरिकांचे होणार लसीकरण!
गर्दी किंवा सार्वजनिक ठिकाणी काम करणारे नागरिक व कर्मचारी यांच्या लसीकरणावर महापालिका भर देणार आहे. कोरोनाचा संसर्ग गर्दीत सर्वात वेगाने पसरु शकतो, म्हणूनच सुपर स्प्रेडर नागरिकांचे लसीकरण वेगाने करण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम सुरू केली असून, यात दररोज ५०० लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. फेरीवाले, दुकानदार, भाजीवाले, हॉटेलमध्ये काम करणारे वेटर, कर्मचारी, डिलिव्हरी बॉय, टॅक्सी, ट्रक चालक अशा सुपर स्प्रेडर नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
(हेही वाचा : वारकरी शिल्पाची समाजकंटकांकडून मोडतोड! ठाकरे सरकारविरोधात संताप)
असे आहे नियोजन
संभाव्य तिस-या लाटेचा धोका नसला, तरी सार्वजनिक ठिकाणी लोक गर्दी करतात म्हणून ‘जिविका हेल्थ केअर’ आणि ‘पालिका’ मिळून ‘सुपर स्प्रेडर’ लसीकरण राबवत आहेत. यात रोज ३०० ते ५०० नागरिकांचे लसीकरण केले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community