मुंबईतील अतिधोकादाक इमारतीत पाडण्यासाठी पोलिसांकडून योग्य ते सहकार्य तसेच पोलिस संरक्षण मिळत नसल्याने आता पुन्हा एकदा सप्टेंबर २०१५च्या परिपत्रकाचा आधार घेतला जाणार आहे. महापालिका आणि मुंबई पोलिस यांच्यातील संवाद वाढावा आणि नागरी सेवा सुविधांची कार्यवाही अधिक वेगाने व्हावी यासाठी तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि तत्कालिन मुंबईचे पोलिस आयुक्त जावेद अहमद यांनी पुढाकार घेतला होता. या संयुक्त बैठकीतच्या आधारे काढलेल्या परिपत्रकाची पुन्हा एकदा अंमलबजावणी करण्यास भाग पाडले जाणार आहे. त्यानुसार आता अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करण्यासाठी या जुन्या परिपत्रकाचा आधार घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांचा समन्वय राखण्यासाठी महापालिका आता पोलिसांना या जुन्या परिपत्रकाची आठवण करून देणार असल्याची माहिती मिळत आहे.
जुन्या परिपत्रकाची आठवण करून देणार
सप्टेंबर २०१५पासून महापालिका आयुक्त व मुंबई पोलिस आयुक्त यांच्यात समन्वय बैठक व पाहणी दौरे आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार परिमंडळीय स्तरावर दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी महापालिकेच्या सर्व सातही परिमंडळाचे उपायुक्त व मुंबई पोलीस दलाच्या सर्व संबंधित परिमंडळांचे अतिरिक्त पोलीस आयुक्त तथा पोलीस उपायुक्त यांच्यात समन्वय बैठका आयोजित करण्यात येत होत्या. परंतु पुढे या बैठका आणि अनुषंगाने निघालेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती.
( हेही वाचा : महापालिका नाही, तर शासन बांधणार धारावीत रोहिदास भवन, लेबल कॅम्पमध्ये आंबेडकर सभागृहाची उभारणी)
परंतु मागील काही महिन्यांपासून अतिधोकादायक इमारती खाली करण्यासाठी पोलिसांकडून योग्य ते सहकार्य केले जात नाही. तसेच पोलिस संरक्षणही मिळत नसल्याने अखेर या जुन्या परिपत्रकाचा आधार घेतला जाणार आहे, असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी लवकरच या परिपत्रकानुसार कोणत्याही अतिधोकादायक इमारतीवर कारवाई करण्यासाठी पोलिस परवानगी घेताना अतिरिक्त पोलीस आयुक्त तथा पोलिस उपायुक्तांच्या पातळीवर दिली जावी आणि यासाठी परिमंडळ उपायुक्तांच्या स्तरावर पोलिस अधिकाऱ्यांचा बैठका घेऊन यावर निर्णय घेतला जावा,अशाप्रकारचा विचार केला जात आहे. जेणेकरून अतिधोकादायक इमारती खाली करण्यासाठी तसेच पाडण्यासाठी स्थानिक पातळीवरच पोलिस संरक्षण प्राप्त होईल आणि पोलिस व महापालिकेच्या समन्वयातून कारवाई केली जाईल असा विश्वास महापालिका अधिकाऱ्यांना वाटत आहे.
Join Our WhatsApp Community