मुंबई महापालिकेचे संगणक कालबाह्य! २७६५ नवीन संगणकांची खरेदी

संगणक व उपकरणे ५ वर्षांपेक्षा जुनी व कालबाह्य झाल्याने विभागांच्या मागणीनुसार यांची संगणक, प्रिंटर, स्कॅनरची खरेदी करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेतील पेपरलेस कामाला सुरुवात झाल्याने संगणकांचा वापर अधिक होऊ लागला आहे. यापूर्वी खरेदी करण्यात आलेले संगणक जुने झाल्याने त्याऐवजी आता नवीन संगणकांची खरेदी केली जात आहे. त्यानुसार आता २ हजार ७६५ संगणकांची खरेदी केली जात आहे. त्या महापालिकेच्या संगणकीय कामकाजासाठी २२.५८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

उपकरणे खरेदीसाठी निविदा

मुंबई महापालिकेने विविध खात्यांच्या तसेच विभागांच्या संगणकीकरणाचा भाग म्हणून ई-ऑफिस, ऑटोडीसीआर, एसएपी, बायोमेट्रिक हजेरी या संगणक प्रणालींचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेतील वाढते संगणकीकरण, तसेच कालबाह्य झालेली उपकरणे या बाबी लक्षात घेता विभाग तथा कार्यालयांसाठी संगणक, लॅपटॉप, प्रिंटर आणि स्कॅनरची खरेदी करणे आवश्यक असल्याने, महापालिकेने यासाठी निविदा मागवल्या होत्या. विविध विभाग तथा कार्यालयांना देण्यात आलेल्या संगणक तथा उपकरणांपैकी बरेच संगणक व उपकरणे ५ वर्षांपेक्षा जुनी व कालबाह्य झाल्याने विभागांच्या मागणीनुसार यांची संगणक, प्रिंटर, स्कॅनरची खरेदी करण्यात येत आहे.

(हेही वाचाः वाहतूक विभागाचा ‘हा’ खर्च मुंबई महापालिका उचलते)

२२.५८ कोटींचा खर्च

यामध्ये ऑल ईन वन संगणक टाईप वन २४१०, टाईप दोन २८० आणि टाईप तीन ७५ अशाप्रकारे २ हजार ७६२ संगणकांची खरेदी केली जाणार आहे. तसेच मिनी लेजर ए फोरसाईज प्रिंटर ५१०, मोनो इंक टॅंक ए फोर प्रिंटर २६५, मल्टीफंक्शन मोनो लेजर प्रिंटर ५०, एडीएफ डॉक्युमेंट स्कॅनर ३६० अशाप्रकारच्या उपकरणांचीही खरेदी केली जाणार आहे. यासाठी मागवलेल्या निविदेत डायकॉन्स सिस्टीम्स अँड सोल्यूशन लिमिटेड कंपनी पात्र ठरली असून, त्यासाठी २२ कोटी ५८ लाख १९ हजार २७४ रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

(हेही वाचाः पवई तलाव अजूनही प्रदूषितच! जल प्रदूषण रोखण्यासाठी नेमला सल्लागार)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here