पुन्हा आरटीपीसीआर चाचण्या सुरु होणार

82

मागच्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे आता पालिकेने खबरदारी म्हणून आरटीपीसीआर चाचण्या सुरु करण्याचे निर्देश खासगी रुग्णालयांना दिले आहेत.

…तर आरटीपीसीआर चाचणी करा

गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत असल्याने, हा निर्णय घेण्यात आला आहे. मोफत आरटीपीसीआर चाचणीसाठी 266 केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. सध्या चीन, अमेरिकेसह काही देशांत कोरोनाचा पुन्हा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने खबरदारीचे पाऊल उचलत बाधित रुग्णांमध्ये लक्षणे आढळल्यास आरटीपीसीआर चाचणी करा असे निर्देश दिले आहेत.

( हेही वाचा: आता बेस्टमध्येही करता येणार रिझर्व्हेशन )

बैठकीत निर्णय

कोरोना सध्या नियंत्रणात असल्याने, खासगी डाॅक्टरांकडे येणारे रुग्ण आरटीपीसीआर चाचणीकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी डाॅक्टरांसोबत पालिकेने नुकतीच एक महत्त्वाची बैठक घेतली, यावेळी लक्षणे असलेल्या रुग्णांना सक्तीने आरटीपीसीआर चाचणी करण्यास सांगावे किंवा पालिकेच्या मोफत केंद्रावर कोविड चाचणी करण्यासाठी पाठवावे, असे निर्देश दिल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.