विशेष प्रतिनिधी
BMC : मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील (BMC Health Department) सहायक वैद्यकीय अधिकारी पदी असलेल्या अधिकाऱ्यांना वैद्यकीय अधिकारी पदी पदोन्नती देण्यासाठी जानेवारी महिन्यात पदोन्नती समितीने मंजुरी दिल्यानंतरही आजतागायत या अधिकाऱ्यांना अद्यापही पदोन्नतीचा (BMC Health Department Promotion) लाभ देण्यात आलेला नाही. त्यामुळे तब्बल ३२३ सहायक वैद्यकीय अधिकारी हे पदोन्नतीपासून वंचित राहिले असून दवाखान्यामध्ये वर्णी लावून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाकडून सुरु असल्याने यासर्वांना चिठ्ठयाद्वारे पदोन्नतीचा लाभ दिला जावा अशाप्रकारची मागणी आता सहायक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. (BMC)
(हेही वाचा – Maharashtra Budget 2025 मधून SC-ST आणि ओबीसी प्रवर्गाला काय मिळाले?)
मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील सहायक वैद्यकीय अधिकारीपदी असलेल्या वैद्यकीय अधिकारी पदी पदोन्नतीचा लाभ देण्यासाठी प्रथम सन २०१६ मध्ये निर्णय घेतला होता. परंतु सन २०१६ मध्ये पदोन्नती समितीच्या (bmc health promotion committee) वतीने १७० पदे मंजूर केली आणि त्यातील काहींना तदर्थ तत्वावर सामावून घेत इतरांना कोणत्याही प्रकारची पदोन्नती देण्यात आली नाही. त्यामुळे तदर्थ तत्वावरील वैद्यकीय अधिकारीपदी कायम नेमणूक होणे आवश्यक असतानाही अद्यापही यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच आता जानेवारी २०२४ मध्ये १५३ सहायक वैद्यकीय अधिकारी पदी असलेल्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीच्या प्रस्तावाला पदोन्नती समितीने मंजुरी दिली. त्यामुळे आजही सन २०१६ मध्ये मंजूर झालेली १७० पदे आणि जानेवारी २०२४ मध्ये मंजूर झालेली १५३ अशाप्रकारे एकूण ३२३ अधिकाऱ्यांना अद्यापही पदोन्नतीचा लाभ मिळत नसल्याने सर्व सहायक वैद्यकीय अधिकारी (Assistant Medical Officer) तसेच प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये (Medical Officers in charge) प्रचंड नाराजी पसरलेली आहे.
(हेही वाचा – अर्थसंकल्पात एसटीला वाटण्याच्या अक्षता; MSRTC ची झोळी रिकामीच)
आरोग्य विभागातील (Department of Health) अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पदोन्नती मिळालेल्या सहायक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश अद्यापही सार्वजनिक कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांकडून काढले जात नाही. परंतु यात त्यांचाही दोष नसून सर्वांनाच दवाखान्यांमध्ये नियुक्ती हवी आहे. कुणीही हॉस्पिटल किंवा अन्य ठिकाणी जायला तयार होत नाहीत. त्यामुळे सर्वांचीच दवाखान्यांमध्ये नियुक्ती करणे शक्य नसून यावर पर्याय म्हणून लॉटरी पध्दतीने सर्वांची नियुक्ती केली जावी अशी मागणी अधिकारी करत आहेत. महापालिकेच्या लेखा विभागात कर्मचाऱ्यांचे बदली आदेश हे सोयीनुसान न करता चिठ्ठी पध्दतीने लॉटरी द्वारे काढले जातात, त्याच धर्तीवर पदोन्नती झालेल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश हे त्यांच्या मागणीनुसार न करता लॉटरीद्वारे काढले जावेत अशी मागणी जोर धरु लागली आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community