सचिन धानजी, मुंबई
महापालिकेच्या बनावट ओळखपत्राच्या (BMC’s QR Code Identity Cards) आधारे लोकांची फसवणूक करणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी प्रशासनाच्यावतीने आता सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसह निवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी कार्पोरेट क्षेत्राच्या धर्तीवर क्यु आर कोड आधारीत नवीन ओळखपत्र (BMC’s QR Code Identity Cards) बनवण्यात येत आहे. या ओळखपत्रांसाठी महापालिकेच्यावतीने तब्बल पावणे सात कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या ओळखपत्रांमुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्याची ओळख पटवणे शक्य होणार आहे.
(हेही वाचा – Ajit Doval : भारताचे जेम्स बॉंड अजित डोवाल)
सगळ्यांसाठी हे ओळखपत्र असणार –
मुंबई महापालिकेत सध्या ९६ हजार कार्यरत कर्मचारी असून १ लाख १२ हजार सेवा निवृत्त कर्मचारी आहेत. या सर्व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कागदी ओळखपत्रे (BMC’s QR Code Identity Cards) वितरीत केली आहेत. परंतु सध्याच्या कागदी ओळखपत्रांमध्ये अनेक त्रुटी आढळून येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या मंजुरीने सध्याच्या प्रचलित पध्दतीनुसार करण्यात येणाऱ्या ओळखपत्राऐवजी कॉर्पोरेट क्षेत्राच्या धर्तीवर क्यु आर कोड आधारीत नवीन ओळखपत्र (BMC’s QR Code Identity Cards) देण्यात येणार आहे. नवीन प्रकारचे हे ओळखपत्र सर्वांनाच देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
३० हजार ओळखपत्रे बनवली जाणार –
महापालिकेच्या यांत्रिक व विद्युत विभागाच्यावतीने यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये मेसर्स अर्ग्युस इलेक्ट्रीक सिक्युरिटी सिस्टीम ही कंपनी पात्र ठरली आहे. या कंपनीच्यावतीने पहिल्या टप्प्यात सुमारे ९६ हजार सध्या सेवेत असणाऱ्या कर्मचारी,अधिकाऱ्यांची ओळखपत्रे बनवली जाणार आहेत. (BMC’s QR Code Identity Cards) तर दुसऱ्या टप्प्यात सुमारे १ लाख १२ हजार सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची ओळखपत्र बनवली जाणार आहे. तर पुढील पाच वर्षातील मागणी विचारात घेता सुमारे ३० हजार ओळखपत्रे बनवली जाणार आहे. त्यामुळे यासर्व ओळखपत्रांसाठी ६ कोटी ८३ लाख ०६ हजार रुपये खर्च केले जाणार आहे. या प्रत्येक ओळखपत्रांसाठी २८७ रुपये एवढा खर्च केला जाणार आहे.
(हेही वाचा – China Kabutar: हेरगिरीच्या संशयावरून ताब्यात घेतले ‘चिनी कबूतर’, ८ महिन्यांपासून पिंजऱ्यात बंदिस्त)
बोगस ओळखपत्राला आळा घालण्यासाठी –
महापालिकेच्या या क्यु आर कोड आधारीत नवीन ओळखपत्रामध्ये (BMC’s QR Code Identity Cards) महापालिकेच्या कार्यरत आणि सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची सर्व प्रकारची माहिती असेल. महापालिकेच्या मानव संसाधन विभाग अर्थात एचआर विभागामार्फत उपलब्ध होणारी सर्व माहिती या क्यु आर कोड आधारीत ओळखपत्रामध्ये समाविष्ठ असेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रावरील क्यु आर कोड स्कॅन करताच ही सर्व माहिती समोर येईल आणि ओळखपत्र धारक कर्मचारी हा महापालिकेचा कर्मचारी आहे की बोगस आहे याची खात्री पटवणेही शक्य होईल,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कोविड काळात मोठ्याप्रमाणात महापालिकेची बोगस ओळखपत्रे बनवली गेली होती, त्यामुळे या बोगस ओळखपत्राला आळा घालण्यासाठी कार्पोरेट क्षेत्राच्या धर्तीवर क्यु आर कोड आधारीत ओळखपत्रे बनवण्याचा निर्णय घेतला. सध्या ही ओळख पत्रे बनवण्याची कार्यवाही सुरु झाली असल्याचे यांत्रिक व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community