देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभरात २६ जानेवारी रोजी साजरा होत असतानाच महापालिकेच्या उद्यान विभागातील (BMC) महिला कर्मचारी सीमा माने यांनी याच दिवशी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट किलीमांजरो येथे भारताचा ध्वज फडकावत भारतीय संविधानाचेही वाचन केले. एवढेच नाही तर माने यांनी मुंबई महापालिकेच्या नावाचा फलकही त्या शिखरावर फडकावला. अशाप्रकारे शिखर सर करणारी ही महापालिकेतील पहिलीच महिला असून यापूर्वी गिर्यारोहण करणाऱ्या अग्निशमन दलाचे जवान बडगुजर यांच्यासह अनेक पुरुष कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शिखर सर केली. परंतु अशाप्रकारे शिखर सर करणारी पहिलीच महापालिका महिला कर्मचारी ठरली आहे.
(हेही वाचा – Hemant Soren : ईडीची धास्ती : ईडीच्या कारवाईनंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता)
संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा प्रसार –
मुंबई महानगरपालिके मधील उद्यान खात्यात उद्यान विद्या सहाय्यक म्हणून कार्यरत असणाऱ्या तथा घाटकोपर भटवाडी येथे राहणाऱ्या सीमा बापू माने यांनी २६ जानेवारी २०२४ रोजी आफ्रिका खंडामधील सर्वात उंच पर्वत माउंट किलीमांजारो हे सर करून आपल्या देशाच्या संविधानाची प्रस्तावना तब्बल १९,३४१ फूट अर्थात ५,८९५ मीटर उंचीवर वाचली. हे शिखर सर करण्यासाठी (BMC) त्यांनी २२ जानेवारी रोजी सुरुवात केली आणि २६ जानेवारी रोजी सकाळी ०७ वाजून १० मिनिटांने ते शिखर सर करत भारताचा तिरंगा ध्वज तिथे फडकावला. तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा प्रसारही त्यांनी त्याद्वारे केला. या मोहिमे आधी सीमा माने यांनी बेसिक आणि ऍडव्हान्स माउंटेनिअरींग कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. आपल्या जीवनातील अनेक अडचणींना मात देत वयाच्या ३८ व्या वर्षी म्हणजे अवघ्या २ वर्षाच्या कालावधी मध्ये त्यांनी आंतराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे व मुंबई महानगरपालिकेचे नाव रेखाटले. (BMC)
(हेही वाचा – Guru Satyanarayan Goenka : जाणून घ्या भारतीय विपश्यना गुरु सत्यनारायण गोयंका यांचा यशस्वी उद्योजक ते गुरु असा प्रवास)
सीमा माने यांची कामगिरी –
मुंबई महानगरपालिका उद्यान खात्याचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूर मधील ३६० एक्सप्लोरर कंपनीमार्फत त्यांनी ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. भविष्यात माऊंट एव्हरेस्ट सहित उर्वरित पाचही खंडातील सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करण्याचा सीमा माने (BMC) यांचा निर्धार आहे. याआधी त्यांनी, हिमाचल प्रदेश मधील फ्रेंडशिप पीक, सिक्कीम मधील काब्रू डोम कॅम्प १ सर केले आहेत. तसेच सह्याद्री मधील वजीर पिनॅकल, स्कॉटिश कडा, तैलाबैला, नवरा पिनॅकल, नवरी पिनॅकल, भैरवगड, हरिश्चंद्र गड, कळसूबाई, माहुली गड, व इतर अनेक गड सर केले आहेत. तसेच काश्मीर मधील अवघड तीन तलावांचा तारसार, मारसार आणि सुंदरसार लेकचे ट्रेक त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community