- ऋजुता लुकतुके
पूर्णपणे विजेवर चालणारी आणि एका चार्जमध्ये ४५० ते ५०० किलोमीटर इतकी धावणारी मध्यम आकाराची सिडान गाडी बीएमडब्ल्यूने बाजारात आणली आहे. आपल्या आय५ आणि आय७ या श्रेणींच्या मध्ये बसेल अशी ही गाडी आहे. आणि शहरांमध्ये आटोपशीर आकार आणि उपयुक्तता यामुळे प्रिमिअम श्रेणीत ही गाडी चांगलीच गाजते आहे. भारतात ही गाडी नेमकी कधी येईल याची अजून स्पष्टता नाही. (BMW i5)
इलेक्ट्रिक गाडीच्या शोधात असलेल्या लोकांना गाडी चालवण्याचा राजेशाही अनुभव आणि दिमाखदार इंटिरिअर देणारी अशी ही गाडी आहे. या गाडीचं इंजिन ३३५ एचपी ई-ड्राईव्ह ४० प्रकारातील आहे. वेगाच्या बाबतीत शून्यापासून ते ६० मैल प्रतीतासाचा वेग ही गाडी ३.३ सेकंदात गाठू शकते. इलेक्ट्रिक असल्यामुळे गाडीचा लुकही स्पोर्टी आहे. (BMW i5)
This year I am already flying. ⚡️
The BMW i5. 100% electric.
The #BMW i5 eDrive40:
Power consumption/100 km, CO2 emission/km, weighted comb.: 19.7–15.9 kWh, 0 g. Electric range: 472–582 km. According to WLTP, https://t.co/twXzMrWMl3. pic.twitter.com/UUvm8g0orE— BMW (@BMW) January 14, 2024
गाडीतील बॅटरी ८४.३ किलोवॅट क्षमतेची आहे. एका चार्जमध्ये ही गाडी ४५० ते ५०० किलोमीटरपर्यंत धावू शकते. बीएमडब्ल्यू कंपनीने आपल्या अनेक शोरुममध्ये जलदगती चार्जर बसवले आहेत. अशा ठिकाणी या गाडीतील बॅटरी पॅक १० ते ८० टक्क्यांपर्यंतचं चार्जिंग ३० मिनिटांत करू शकते. (BMW i5)
(हेही वाचा – Army Day India : भारतीय सेनेच्या पराक्रमाचे स्मरण करणारा भारतीय सेना दिवस)
१४.९ इंचांचा मोठा इन्फोटेनमेंट डिस्प्ले
या गाडीचं इंटिरिअर हे बीएमडब्ल्यू ५ सीरिजमधील इतर गाड्यां इतकंच प्रशस्त आणि आधुनिक आहे. उलट आय५ या सीरिजमध्ये कंपनीने व्हेगांझा या नवीन श्रेणीच्या लेदर सिट्स आणि इतर इंटिरिअर बसवलं आहे. गाडीत चालकाच्या समोर १२.३ इंचांचा डिजिटल डिस्प्ले आहे. तर १४.९ इंचांचा मोठा इन्फोटेनमेंट डिस्प्लेही आहे. (BMW i5)
वायरलेस चार्जिंगपॅड आहे. तसंच हरमनची स्टिरिओ सिस्टिम आणि वाय-फाय हॉटस्पॉटही आहे. या गाडीची स्पर्धा मर्सिडिज बेंझ ईक्यूई, पोर्श टेकॅन आणि टेस्ला मॉडेल एस या गाड्यांशी असेल. भारतात या गाडीची किंमत सुमारे १ कोटी रुपये इतकी असेल असं बोललं जात आहे. (BMW i5)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community