Boat Capsized In Congo : काँगोमध्ये फुटबॉलपटूंना घेऊन जाणारी बोट उलटली; २५ जणांचा मृत्यू

55

काँगोमध्ये (Congo) बोट उलटल्याने झालेल्या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला. या बोटीवर अनेक फुटबॉलपटूही होते. हे खेळाडू रविवार, ९ मार्चच्या रात्री माई-न्डोम्बे प्रांतातील मुशी शहरात एका सामना खेळून परतत असताना त्यांना घेऊन जाणारी बोट क्वा नदीत उलटली, अशी माहिती प्रांत प्रवक्ते अ‍ॅलेक्सिस म्पुटू यांनी दिली. (Boat Capsized In Congo)

(हेही वाचा – BMC चे सहायक वैद्यकीय अधिकारी पदोन्नतीपासून वंचित, नियुक्ती आदेश लॉटरीद्वारे काढण्याची केली होती मागणी)

बोट अपघातानंतर आतापर्यंत जवळपास ३० लोकांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, अनेक लोक अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती मुशीचे (Mushi) स्थानीय अधिकारी रेनेकल क्वातिबा यांनी दिली.

काँगोमध्ये रस्ते आणि इतर वाहतुकीच्या सुविधा सर्वत्र उपलब्ध नाहीत. येथील दळणवळणाचे मुख्य साधन नद्याच आहेत. सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या उपकरणांची कमतरता आणि बोटिंची गर्दी यामुळे रात्रीच्या वेळी काँगोमध्ये असे बोट सातत्याने होत असतात. काँगोतील १० कोटींहून अधिक लोक हे नद्यांवर अवलंबून आहेत. त्यामुळे वारंवार होणाऱ्या अपघातांत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे मुबलक रस्ते नसल्याने लोकांना नदी मार्गाने प्रवास करावा लागतो. मात्र असुरक्षित बोटींमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो. (Boat Capsized In Congo)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.