Bodleian Library Tour : जगप्रसिद्ध बोडलियन लायब्ररीविषयी तुम्हालाही उत्सुकता आहे का ? मग हे वाचा…

138
Bodleian Library Tour : बोडलियन लायब्ररी पहायची आहे का ? मग हे वाचा...

बोडलियन लायब्ररी (Bodleian Library) ही ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीची मुख्य संशोधन लायब्ररी आहे. (Bodleian Library Tour) युरोपमधील सर्वांत प्राचीन पुस्तकालय अशी या लायब्ररीची ओळख आहे. थॉमस बोडली हे या लायब्ररीचे संस्थापक होते आणि त्यांच्याच नावावरून या लायब्ररीचे नामकरण करण्यात आले आहे. या पुस्तकालयात एक कोटी तीस लाखांपेक्षा अधिक पुस्तके आहेत. ब्रिटिश लायब्ररीनंतर हे ब्रिटनमधील सर्वांत मोठे पुस्तकालय आहे.

कधी झाली स्थापना ?

८ नोव्हेंबर १६०६ रोजी या पुस्तकालयाची स्थापना झाली होती. ४०० पेक्षा अधिक वर्षे बोडलियन पुस्तकालय संशोधन, संस्कृती आणि इतिहासाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. बोडलियन लायब्ररीच्या इमारतीची वास्तुकला पाहण्यासाठी जगभरातून लोक तिथे येत येतात. आता जर तुम्हाला ही लायब्ररी पाहायची असेल, तर विशेष तयारी करावी लागेल. (Bodleian Library Tour)

(हेही वाचा – Pune : पुण्यात साखळी बाँम्बस्फोट करण्याचा कट रचणाऱ्या तिघांना अटक)

प्रवासासाठी संपर्क कुठे करायचा ?

सर्वांत आधी तुम्हाला निश्चित करावे लागेल की, तुम्ही किती दिवस तिथे घालवणार आहात. त्यानुसार तुम्ही टूर बूक करायला हवी. त्यासाठी बोडलियन लायब्ररीच्या टुर्स टीमशी संपर्क साधता येईल. सोमवार ते शुक्रवार या दिवसांत (सार्वजनिक सुट्टी वगळून) तुम्ही सकाळी ९ ते संध्याकाळी ४ पर्यंत संपर्क साधू शकता.

द्यावे लागेल प्रतिज्ञापत्र

“मी याद्वारे असे घोषित करतो की, या लायब्ररीमधील कोणतेही खंड, दस्तऐवज किंवा त्या संबंधित इतर कोणतीही वस्तू जागेवरून हलवणार नाही, त्यावर खूण करणार नाही, खराब करणार नाही किंवा मोडणार नाही, त्या लायब्ररीमध्ये मी कोणत्याही प्रकारे प्रज्वलित होणारी वस्तू आणणार नाही, ज्योत प्रज्वलित नाही आणि तसेच लायब्ररीमध्ये धूम्रपान करणार नाही; मी लायब्ररीचे सर्व नियम पाळण्याचे वचन देतो.”

अशा प्रकारची इंग्रजी लेखी प्रतिज्ञा दिल्यानंतरच तुम्हाला लायब्ररीत प्रवेश मिळू शकेल. (Bodleian Library Tour)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.