बोगस लसीकरण : पाचवा गुन्हा दाखल, सहावी अटक!

कांदिवली पोलिसांनी गुडीया यादव हिला अटक केली. ती नेस्को सेंटरमधून कोविन अप्लिकेशनचे युजर नेम आणि पासवर्डची चोरी केली होती, अशी माहिती समोर आली आहे.

68

मुंबईत बोगस लसीकरण प्रकरणी पाचवा गुन्हा भोईवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला असून कांदिवली पोलिसांनी बोगस लसीकरण प्रकरणी गुडीया यादव ही सहावी अटक केली आहे. मुंबईत आतापर्यंत झालेल्या बोगस लसीकरणातून २ हजार २५३ जणांचे लसीकरण झाल्याचे समोर आले आहे.

परळ येथील पोद्दार सेंटरमध्ये लसीकरण मोहीम राबवली!

परळ येथील पोद्दार सेंटर या ठिकाणी २८ आणि २९ मे रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात आल्या होत्या. या लसीकरणात महेंद्र सिंह, सीमा सिंह आणि श्रीकांत माने या तिघांनी आयोजित केली होती. येथील २०८ जणांना लस देण्यात आली असून नानावटी आणि लाईफ लाईन केअर रुग्णालयाच्या लसीकरणाचे प्रमाणपत्र लाभार्त्यांना देण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र बोगस असल्याचा संशय असून या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस लसीकरणात सर्वात पहिला गुन्हा कांदिवली पोलिस ठाण्यात दाखल झाला होता, या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर वर्सोवा, खार, बोरिवली पोलिस ठाण्यात बोगस लसीकरण प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे.

(हेही वाचा : पुण्याच्या आंबिल ओढा येथे स्थानिकांचा आक्रोश! काय आहे प्रकरण?)

लसीकरण सेंटरमधून ओळख पत्र आणि पासवर्ड चोरला!

कांदिवली पोलिसांनी बोगस लसीकरण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांपैकी दोघांनी नेस्को कोविड सेंटर येथील लसीकरण सेंटरमधून ओळख पत्र आणि पासवर्ड चोरला होता, अशी माहिती चौकशीत समोर आली होती. दरम्यान कांदिवली पोलिसांनी गुडीया यादव हिला अटक करण्यात आली आहे. गुडीया यादव ही गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कामाला होती. गुडीयाने नेस्को सेंटरमधून कोविन अप्लिकेशनचे युजर नेम आणि पासवर्डची चोरी केली होती, अशी माहिती समोर आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.