Bogus औषधांवर उपाय काय?

47
Bogus औषधांवर उपाय काय?
  • खास प्रतिनिधी 

राज्यात गेल्या काही दिवसांत अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात तसेच वर्धा आणि भिवंडीमध्येही शासकीय रुग्णालायला बनावट (Bogus) औषधे पुरवण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुरत आणि ठाणे येथील काही व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र या समस्येवर उपाय काय यावर कोणी काही बोलत नाही. याला अपवाद आहे तो, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांडळे यांचा.

मनुष्यबळ कमी

कैलास तांडळे यांनी बनावट (Bogus) औषध पुरवठा होण्याची कारणे आणि त्यावर काय उपाय आहे याची माहिती हिंदुस्थान पोस्टशी बोलताना दिली. तांडळे म्हणाले, “अन्न आणि औषध प्रशासनाने गेल्या १५-२० वर्षात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागा भरल्या नाहीत, त्यामुळे मनुष्यबळ कमी पडते, लॅबची संख्या कमी असल्याने तपासणी अहवाल प्राप्त होण्यास विलंब होतो, औषध निर्मिती परराज्यात केली जाते, बनावट परवाने वितरित केले जातात, अनेक फार्मासिस्ट बोगस आहेत,” अशी माहिती तांडळे यांनी दिली.

(हेही वाचा – हिंदूंच्या दणक्यानंतर काँग्रेस नमली; कर्नाटक विधानसभेतून Veer Savarkar यांचे चित्र न हटवण्याचा निर्णय)

वेगळ्या मंत्रालयाची गरज

यावर उपाय सांगताना तांडळे म्हणाले, ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडियाचे आरोग्य व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे अपयशी ठरले आहे. तसेच बनावट औषधे रोखायचे असतील तर हा विभाग सांभाळण्यासाठी वेगळ्या फार्माच्या मंत्रालयाची निर्मिती होणे आवश्यक आहे. सदया मिनिस्ट्री ऑफ केमिकल अँड फर्टिलायजर्स या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली काम करते. ते वेगळे झाल्यास निश्चित फरक पडेल, असे मत तांडळे यांनी व्यक्त केले.

सद्यस्थिती

स्वराती रुग्णालयातील अॅझिमसिम ५०० या गोळीचे नमुने, १० ऑगस्ट २०२३ रोजी औषध निरीक्षकांनी तपासणीसाठी घेतले होते. याचा तपासणी अहवाल एक वर्षानंतर, ऑक्टोबर २०२४ मध्ये प्राप्त झाला. ई-टेंडरिंगद्वारे २५ हजार ९०० गोळ्यांचा पुरवठा कोल्हापूरच्या विशाल एंटरप्रायजेसने, जुलै २०२३ रोजी केला होता. आता हा पुरवठा स्वराती रुग्णालयात शिल्लक नसून ही कंपनीच अस्तित्वात नसल्याचे तपासात उघड झाले आहे. काबीज जेनेरिक हाऊस विरोधात बनावट (Bogus) औषध पुरवठ्याबाबत यापूर्वी वर्धा व भिवंडी येथेही गुन्ह्याची नोंद आहे. आंतरराज्य टोळीचा यात समावेश असण्याची औषध विभागाला शंका आहे, अशी परिस्थिती आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.