बोगस लसीकरण प्रकरणी अकरावा गुन्हा दाखल! एकूण १३ आरोपींना अटक

शिवम रुग्णालयात कोविशिल्डच्या रिकाम्या बॉटलमध्ये सलाईनचे पाणी भरून लसीकरणच्या ठिकाणी वापरले. हे रुग्णालयात सील करण्यात यावे यासाठी पोलिसांकडून महानगरपालिकेला कळवण्यात येणार असल्याचे समजते.

63

बोगस लसीकरण प्रकरणी मुंबईत १०, तर ठाण्यात एक असे एकूण अकरा गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात विशेष तपास पथकाने मुंबईतील एका बड्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यासह चारकोपमधील शिवम रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून आरोपीची संख्या १३ झाली आहे.

सूत्रधार राजेश पांडे याला बारामती येथून अटक

कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज इमारतीत झालेल्या बोगस लसीकरण प्रकरणी कांदिवली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात महेंद्र सिंह यांच्या पाच जणांना प्रथम अटक करण्यात आली होती. महेंद्र सिंह हा सुत्रधारापैकी एक असून त्याने मुंबईसह इतर ठाण्यात बोगस लसीकरण मोहीम राबवून मोठ्या रकमा उकळल्याची कबुली दिली होती. या बोगस लसीकरण प्रकरणात एक एक करता कालपर्यत मुंबईतील भोईवाडा, बोरिवली, आंबोली, कांदिवली, समता नगर, अंधेरी एमआयडीसी आणि ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात अकरा गुन्हे दाखल झाले आहे. बोगस लसीकरण प्रकरणाचा तपासासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. या गुरुवारी या प्रकरणातील सुत्रधारापैकी एक सूत्रधार राजेश पांडे याला बारामती येथून अटक केली असून चारकोप येथील शिवम रुग्णालयातील आणखी एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपीची संख्या १३ झाली आहे.

(हेही वाचा : अनिल देशमुखांचा वसुलीमध्ये थेट सहभाग! संजीव पालांडे यांची कबुली )

शिवम रुग्णालयात लसीच्या जागी पाणी भरले जात होते!

बोगस लसीकरणात शिवम रुग्णालयाची महत्वाची भूमिका आहे, या रुग्णालयाच्या मालकाचा यात सहभाग आढळून आला असल्याने त्याला देखील गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. शिवम रुग्णालयात कोविशिल्डच्या रिकाम्या बॉटलमध्ये सलाईनचे पाणी भरून लसीकरणच्या ठिकाणी वापरले जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
हे रुग्णालयात सील करण्यात यावे यासाठी पोलिसांकडून महानगरपालिकेला कळवण्यात येणार असल्याचे समजते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.