प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार दलीप ताहिल (Dalip Tahil) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी दलीप ताहिल यांना 2 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण 2018 सालचे आहे. दिलीप ताहिल दारूच्या नशेत होते आणि त्यांनी एका ऑटोला धडक दिली. या घटनेत एक महिला जखमी झाली. तब्बल पाच वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार दलीप यांच्या तोंडातून दारूचा वास येत होता, ते नीट चालू शकत नव्हते, तसेच ते नीट बोलू शकत नव्हते. हे सर्व पुरावे विचारात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी दलीप ताहिल (Dalip Tahil) यांना दोषी ठरवले आणि त्यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
(हेही वाचा – Lalit Patil : ड्रग्ज प्रकरणी तपासाला वेग; ललित पाटीलला घेऊन पोलिसांची नाशिकमध्ये झडती)
नक्की प्रकार काय?
हे ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरण 2018 चे 5 वर्षे जुने आहे. जेनिता गांधी आपल्या मित्रासोबत रिक्षाने जात होत्याय त्यावेळी (Dalip Tahil) दलीप ताहिल यांच्या गाडीने त्यांना धडक दिली. अपघातानंतर दलीप ताहिल यांनी घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत अडकल्यामुळे ते पकडले गेले. ‘धडक दिल्यावर आम्ही रिक्षातून उतरलो, तेव्हा कार दलीप ताहिल चालवत असल्याचं आमच्या लक्षात आलं. आम्ही गाडीचा नंबर लिहून घेतला. ताहिल यांनी गाडीबाहेर येऊन वाद घालायला सुरुवात केली आणि माझ्या मित्राला धक्काबुक्की केली.’ असं जेनिता गांधींनी जबानीत लिहिलं. या प्रकरणी दलीप ताहिल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी (Dalip Tahil) अभिनेता दलीप ताहिल यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली असली तरी हा खटला सुरूच होता. अशा परिस्थितीत आता या खटल्याचा निकाल आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community