अभिनेत्री राखी सावंतला अटक, नेमके काय आहे प्रकरण?

अभिनेत्री राखी सावंतला मॉडेलचा फोटो व्हायरल केल्याच्या आरोपाखाली आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. राखीने फोटो व्हायरल केला होता अशी तक्रार या मॉडेलने पोलिसांत केली आहे. आंबोली पोलिसांनी राखी सावंतला ८३३/२०२२ क्रमांकाच्या एफआयआरप्रकरणी अटक केली आहे. राखीने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला अशी माहिती अभिनेत्री शरलिन चोप्राने ट्वीट करत दिली आहे.

( हेही वाचा : गोव्याला जाताना होणार दोन तासांची बचत! कोकणकन्या झाली ‘सुपरफास्ट’, असे आहे नवे वेळापत्रक)

 

काही दिवसांपूर्वी राखीने एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी त्या मॉडेलने आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी राखीला अटक केली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये राखी विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर राखीला अनेकदा चौकशीसाठी बोलावले होते अखेर गुरूवारी तिला अटक करण्यात आली आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here