Pakistan मधील महाविद्यालयात भारतीय गाण्यावर नाचण्यास बंदी; नेमकं कारण काय?

42
Pakistan मधील महाविद्यालयात भारतीय गाण्यावर नाचण्यास बंदी; नेमकं कारण काय?
Pakistan मधील महाविद्यालयात भारतीय गाण्यावर नाचण्यास बंदी; नेमकं कारण काय?

पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब (Punjab) प्रांतातील शैक्षणिक संस्थांमध्ये भारतीय गाण्यांवर नाचण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पंजाब उच्च शिक्षण आयोगाने (Punjab Higher Education Commission) सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही महाविद्यालयांसाठी लागू केला आहे. महाविद्यालयांमधील ‘अनैतिक आणि अश्लील’ कारवाया थांबवण्यासाठी असा आदेश जारी करण्यात येत असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

( हेही वाचा : Honey Bee Attack : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला; 50 ते 60 पर्यटक जखमी

पंजाबचे (Punjab) शिक्षण संचालक सय्यद अन्सार अजहर (Syed Ansar Azhar) यांनी जारी केलेल्या सर्व सूचनांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात विद्यार्थी खाजगी तसेच सार्वजनिक ठिकाणी भारतीय गाण्यांवर नाचताना दिसले आहेत. अशा परिस्थितीत, शैक्षणिक संस्थांमध्ये असे कृत्य करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जर अशी कृती कोणाकडून घडली तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

होळीच्या निमित्ताने पाकिस्तानी महाविद्यालयांमध्ये असे निर्बंध लादण्याची ही पहिलीच घटना नाहीये. पाकिस्तानातील कराची येथील दाऊद अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने (Dawood University of Engineering and Technology) अलीकडेच हिंदू (Hindu) विद्यार्थ्यांनी होळी साजरी केल्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याशिवाय, कायद-ए-आझम विद्यापीठाने (Quaid-e-Azam University) विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये होळी (Holi) खेळण्यास बंदी घातली होती आणि म्हटले होते की होळी साजरी केल्याने देशाची इस्लामिक ओळख नष्ट होईल. लाहोरमधील (Lahore) पंजाब विद्यापीठात ३० हिंदू (Hindu) विद्यार्थ्यांना होळी साजरी करण्यापासून रोखण्यात आले होते. या घटनेत सुमारे १५ विद्यार्थी जखमी झाले. (Punjab)

त्यामुळे पाकिस्तानमध्ये दरवर्षी हिंदू (Hindu) सण साजरे होतात तेव्हा अशा निर्बंधांबद्दल सर्वत्र चर्चा होऊ लागते. होळीसारखे उत्सव आयोजित केल्याने देशाच्या सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांवर परिणाम होईल, असे पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाचे मत आहे. यामुळे देशाच्या इस्लामिक अस्मितेला हानी पोहोचू शकते, असेही सांगण्यात येत आहे. (Punjab)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.