Bomb Threat : मुंबईहून केरळला जाणाऱ्या Air India च्या विमानात बॉम्बची धमकी

128
Bomb Threat : मुंबईहून केरळला जाणाऱ्या Air India च्या विमानात बॉम्बची धमकी
Bomb Threat : मुंबईहून केरळला जाणाऱ्या Air India च्या विमानात बॉम्बची धमकी

मुंबईवरून केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरमला जात असलेल्या एका विमानात गुरुवार, २२ ऑगस्ट रोजी बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. या धमकीनंतर तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर एकच खळबळ उडाली. तिरुअनंतपुरम एअरपोर्टवर इमरजन्सी घोषित करण्यात आली आहे. प्रवाशांना विमानातून बाहेर काढले जात आहे. मात्र, बॉमच्या धमकीने संपूर्ण एअरपोर्टवर प्रचंड गोंधळ उडाला आहे. (Bomb Threat)

(हेही वाचा – …तोपर्यंत तुम्ही गांभीर्याने घेणारच नाही का? बलात्कार प्रकरणावरून Bombay High Court ची सरकारवर आगपाखड)

इतर विमानांना कसल्याही प्रकारचा धोका नाही

“एअर इंडिया (Air India) फ्लाइट 657 तिरुअनंतपुरम (Thiruvananthapuram) एअरपोर्टवर लँड झाले आहे. बॉम्बच्या धमकीनंतर इमरजन्सी घोषित करण्यात आली आहे. संबंधित विमान सध्या आयसोलेशन बेमध्ये ठेवण्यात आले आहे. प्रवाशांना लवकरच बाहेर काढले जाईल. हे विमान आयसोलेशन बेमध्ये ठेवण्यात आल्याने इतर विमानांना कसल्याही प्रकारचा धोका नाही. ही बॉम्बची धमकी अफवा तर नाही, यासंदर्भात तपास सुरू आहे. कारण अधिकांश प्रकरणात असेच घडते, अशी माहिती एअरपोर्ट प्रशासनाने दिली आहे. (Bomb Threat)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.