पवईतील सायकल ट्रॅकच्या बांधकामाला उच्च न्यायालयाची स्थगिती

आयआयटीतील दोघा विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.

मुंबई महापालिकेचा विशेषतः पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणाऱ्या पवई तलावालगतच्या सायकल ट्रॅक प्रकल्पाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. खारफुटीच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या या सायकल ट्रॅकचे काम थांबवण्यात यावे, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात आयआयटी पवईतील दोन विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत या बांधकामाला १८ नोव्हेंबरर्यंत तात्पुरती स्थगिती दिली.

आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी केली याचिका

मुंबई महापालिकेमार्फत पवई तलाव परिसराचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी तलावालगत सायकल, जॉगिंग ट्रॅक व सुशोभीकरण केले जाणार आहे. या कामाला सुरुवातही करण्यात आली होती. मात्र हा ट्रॅक खारफुटीच्या जागेवर बांधण्यात येत असून त्यासाठी तलावात भराव टाकला जाणार आहे. तसेच या कामात इथली काही झाडांची कत्तल होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होईल, असा दावा करत ओमकार सुपेकर व अभिषेक त्रिपाठी या पीएचडी करणाऱ्या आयआयटीतील दोघा विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर सोमवारी सुटीकालीन न्यायालयात न्यायमूर्ती न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

(हेही वाचा : आतापर्यंत ५ मंत्र्यांना अटक! ४ राष्ट्रवादीचेच!)

नैसर्गिक संपत्तीचे नुकसान होणार

याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले की, पवई तलावात अनेक झाडे आहेत. तिथे विविध प्रजातीचे पक्षीही आहेत. याशिवाय तलावात मगर, कासव व विविध जलचरांचही अस्तित्वात आहे. सायकल ट्रॅकसाठी त्या ठिकाणी भराव टाकला जाणार आहे. तसेच झाडेही तोडली जाणार आहेत. नैसर्गिक हानी करून कोणतेही बांधकाम केले जाणार नाही असा पालिकेच्यावतीने वकील अस्पी चिनॉय यांनी युक्तिवाद केला. त्यांनी सांगितले की, ही जागा मुळात खारफुटीचीच नाही. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत तूर्तास या कामाला स्थगिती दिली आहे. तसेच राज्य सरकारची बाजू मांडणाऱ्या ऍड. ज्योती चव्हाण यांना या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here