‘श्रद्धा वालकर हत्येसारखे प्रकार ‘या’ कारणामुळे घडतात’, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींचे स्पष्ट मत

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा उल्लेख करत वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना दत्ता बोलत होते. इंचरनेटवर कोणत्याही प्रकारची माहिती अगदी सहज उपलब्ध होत असल्याने त्याचे अनेक गुष्परिणाम भोगावे लागतात, श्रद्धा वालकर प्रकरण हे त्याचंच एक उदाहरण असल्याचेही न्यायमूर्ती दत्ता यांनी यावेळी म्हटले आहे.

श्रद्धा हत्या प्रकरणाचा केला उल्लेख

देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अशा प्रकरणांना आळा घालणे गरजेचे आहे. श्रद्धा वालकर हत्या प्रकरण आजच्या काळातील इंटरनेटवर सहज उपलब्ध होणा-या माहितीचा दुष्परिणाम आहे. मुंबईत प्रेम आणि दिल्लीत हत्या असे प्रकार घडतात कारण सर्व माहिती इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. त्यामुळे या प्रकरणांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे करण्याची आवश्यकता असल्याचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः ‘त्यांच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ…’, राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया)

व्यक्त केला विश्वास

मला विश्वास आहे की केंद्र सरकार याबाबत नक्कीच सकारात्मक विचार कुन योग्य दिशेने पावले उचलत आहे. त्यामुळे केंद्र सरकार यासाठी कठोर कायदे करुन, हे प्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वासही न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here