लग्न करुन सासरी जाणा-या मुलीला घरकामं करावी लागतात. यामुळे अनेक विवाहित तरुणी यावरुन अनेकदा तक्रारी करताना दिसतात. पण याचबाबत आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठी टिप्पणी केली आहे.
लग्न झालेल्या महिलेला घरकामं करायला सांगणं म्हणजे याचा अर्थ तिला नोकरासारखी वागणूक देणं असा होत नाही. तिला जर घरातील कामं करायची नसतील तर तिने लग्नाआधीच ते स्पष्ट करायला हवं, असंही न्यायालयाने म्हटले आहे.
(हेही वाचाः ऑस्ट्रेलियात भारताच्या सामन्यांनाच जास्त गर्दी, ऑस्ट्रेलियन टीमकडे चाहत्यांनी फिरवली पाठ, हताश वॉर्नर म्हणतो…)
काम सांगणं म्हणजे नोकरासारखं वागवणं नाही
लग्न होऊन सासरी आलेल्या मुलीला घरातील कामं करायला लावणं म्हणजे तिला नोकरासारखं वागवणं असा त्याचा अर्थ होत नाही. जोपर्यंत पती किंवा सासरच्या मंडळींनी केलेल्या कृत्याबाबत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत ते क्रौर्य आहे किंवा नाही हे सांगता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
तर मुलींनी आधीच स्पष्ट करायला हवं
मुलीला जर लग्नानंतर घरातील कामं करायची नसतील तर तिने त्याची कल्पना लग्नाआधीच सासरच्या मंडळींना द्यायला हवी. जेणेकरुन तिच्याशी लग्न करायचे किंवा नाही हे पतीला ठरवता येईल, अशी महत्वपूर्ण टिप्पणी न्यायालयाने एका खटल्यादरम्यान केली आहे.
Join Our WhatsApp Community