चेक बाऊन्सच्या खटलासंदर्भात Mumbai High Court ने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

369

तपासादरम्यान आरोपी किंवा त्यांचे वकील हजर न राहिल्यास निगोशिएबल च्या (एनआय कायदा) कलम १३८ चा खटला आरोपीच्या अनुपस्थितीत चालविता येतो आणि आरोपीचा जबाब न नोंदवता पूर्ण करता येतो, असे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. (Mumbai High Court)

मुंबईत सुषमा चांडक (Sushma Chandak) यांनी नवनीतसिंग (Navneet Singh) यांना एक कोटी रुपये  दिले होते. २९ ऑक्टोबर २०१५ चे ५० लाखांचे दोन चेक नवनीतसिंग यांनी सुषमा यांना दिले. बँकेत चेक वटले नाहीत. सुषमा यांनी १३८ एनआय कायद्यान्वये (138 NI Act) दोन गुन्हे दाखल केले. यात नवनीतसिंग, त्यांची पत्नी व त्यांच्या कंपनीला आरोपी करण्यात आले होते.

(हेही वाचा – पाच वर्षांत घरगुती विजेचे दर घटणार; BJP सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा)

नवनीतसिंग आणि इतरांनी हायकोर्टात (High Court) अपील केले. तक्रारदाराने त्यांच्या उपस्थितीसाठी प्रयत्न केले नाहीत. अनुपस्थितीत खटला चालवणे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाच्या विरुद्ध आहे, असा युक्तिवाद करण्यात आला. न्यायमूर्ती एस. एम. मोडक म्हणाले की, १३८ एनआय कायदा ‘अर्ध-गुन्हेगारी स्वरूपाचा’ आहे. त्यामुळे दंडाधिकारी कलम १३८ एनआय कायद्यांतर्गत आरोपीच्या उपस्थितीशिवाय खटला चालवू शकतात. 

(हेही वाचा – ‘जम्बो मेगाब्लॉक’मुळे Western Railway चे प्रवासी खोळंबले ; अंधेरी, बोरीवली स्थानकांवर तुफान गर्दी)

९ टक्के खटले एनआय कायद्याचे 

न्यायालयात प्रलंबित खटल्यांपैकी सुमारे ९ टक्के १३८ एनआय कायद्याचे आहेत. यात आरोपी हजर नसल्याने खटले प्रलंबित राहण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. या निर्णयाचा परिणाम अशा खटल्यांवर होईल.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.