मीनाक्षी मगदूम या विधवा स्त्रीची आणि तिच्या कुटुंबियांच्या मालकीची जागा कोल्हापूर विमानतळासाठी (Kolhapur Airport) संपादित करण्यात आली. या जमिनीवर जी.बी. इंडस्ट्रीजची (GB Industries) फर्म भाडेकरारावर कार्यरत होती. मात्र, हा भाडेकरार २०२० मध्ये संपुष्टात आला. भाडेकरार संपुष्टात येऊनही कंपनीने सरकारकडे नुकसान भरपाईचा दावा केला. भाडेकरार संपुष्टात आला असतानाही कंपनीचा जमिनीवरील कायदेशीर अधिकार सिद्ध करण्याचा प्रयत्न होता. (Bombay High Court)
(हेही वाचा – Solapur Accident : सोलापूरात भीषण अपघात; २ ठार तर ६ जण गंभीर जखमी)
या प्रक्रियेत न्यायालयाचा बराच वेळ फुकट गेल्याने न्यायालयाने याचिकाकर्त्याला दंड ठोठावला आहे. पाच लाख रुपये दंड भरण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे, तसेच दंडाची रक्कम भरली नाही, तर त्यांच्या कंपनीची संपत्ती विकून रक्कम वसूल करण्यात येईल, अशी तंबीही न्यायालयाने दिली.
न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर केल्याबद्दल आणि प्रतिवादींना विशेषत: विधवा आणि तिच्या कुटुंबियांना कोल्हापूर विमानतळाशी संबंधित भूसंपादनाच्या वादात नाहक त्रास दिल्याबद्दल न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने याचिकादारावर ताशेरे ओढण्यात आले आहेत.
तथ्यहीन याचिका करण्याचा ट्रेंड – न्यायालय
‘न्यायालयाचा अडीच तासांहून अधिक मौल्यवान वेळ वाया घालविण्यात आला, तसेच अन्य याचिकादारांना त्यांचे प्रकरण सुनावणीस येईपर्यंत वाट पाहावी लागली. न्यायालयावर कामाचा ताण वाढला आहे. अशा परिस्थिती याचिकादाराने न्यायालयाचा महत्त्वाचा वेळ वाया घालविला, याकडे दुर्लक्ष करू शकत नाही,’ असे न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी करतांना नमूद केले.
न्यायालय म्हणाले की, तथ्यहीन याचिका दाखल करण्याचा सध्या ट्रेंड सुरूआहे. अशा पद्धतीने केवळ न्यायिक संसाधनांचा अपव्यय होत नाही, तर खऱ्या कायदेशीर दावेदारांचे हक्क बाधित होतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community