Bombay High Court : मुस्लिम पुरुषांच्या एका पेक्षा अधिक ‘विवाहाला’ आता कायद्याची मान्यता! 

233

मुस्लिम पुरुषाला एकापेक्षा अधिक लग्न (muslim man multiple marriage) करण्यास मुस्लिम धर्मीयांच्या वैयक्तिक कायद्याने परवानगी दिली आहे. त्यामुळे, मुस्लिम पुरुषाने एकापेक्षा अधिक विवाह केले असतील तर महाराष्ट्र विवाह मंडळ आणि विवाह नोंदणी कायद्याअंतर्गत त्यांची नोंदणी करण्याची मुभा देखील त्याला आहे, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने  दिला आहे. (Bombay High Court)

ठाणे महापालिकेने (Thane Municipality) अर्जदार मुस्लिम पुरुषाच्या दुसऱ्या विवाहाची नोंदणी केलेली असताना तिसऱ्या विवाहाच्या नोंदणीच्या वेळी मात्र, एकाच विवाहाची नोंदणी होऊ शकते, अशी भूमिका घेतल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) आश्चर्य व्यक्त केले. त्याचबरोबर मुस्लिमांच्या व्यक्तीविषयक कायद्यान्वये (Personal Law) एकाहून अधिक विवाहांना परवानगी असल्याने त्या विवाहांच्या नोंदणीला आडकाठी नाही, असा निर्वाळा देत त्यांनी ठाणे महापालिकेचा (Thane Municipality) निर्णय रद्द केला. (Bombay High Court)

मुस्लिम पुरुषांबाबत (muslim man multiple marriage) उच्च न्यायालयाचा निर्वाळा ठाण्यातील मुस्लिम व्यक्तीने अल्जेरियामधील महिलेसोबत तिसरा विवाह केल्यानंतर ६ फेब्रुवारी २०२३ रोजी महापालिकेच्या विवाह उपनिबंधकांकडे नोंदणीसाठी अर्ज दिला होता. मात्र, महाराष्ट्र विवाह मंडळांचे विनियमन व विवाह नोंदणी कायद्यातील तरतुदीप्रमाणे एकाच विवाहाची नोंदणी होऊ शकते आणि पूर्ण कागदपत्रे दिली नाहीत, अशी कारणे देत त्यांनी अर्ज फेटाळला. त्यामुळे त्या व्यक्तीने अॅड. अर्शद शेख व अॅड. हफिजूर रहमान यांच्यामार्फत गेल्या वर्षी रिट याचिका केली होती. या विषयीच्या अंतिम सुनावणीअंती न्या. बी. पी. कुलाबावाला व न्या. सोमसेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. ‘महाराष्ट्र विवाह मंडळांच्या विनियमन तिसऱ्या विवाहाची नोंदणीही मान्य व विवाह नोंदणी कायद्यातील तरतुदी पाहिल्या तर पतीने विवाहानंतर ९० दिवसांत नोंदणीसाठी अर्ज करायचा असतो. 

त्यानंतर उपनिबंधकाने कायद्यातील तरतुदीप्रमाणे विवाह झाला आहे की, नाही, याची सत्यता व पडताळणी कागदपत्रांच्या आधारे तपासून आणि शंका असल्यास पोलिसांमार्फत पडताळणी करून नोंदणी करायची असते. नोंदणी नाकारण्याचा आदेश दिल्यास त्याची प्रत निबंधकांकडे पाठवायची असते. त्यानंतर निबंधकांनी पक्षकारांना सुनावणी देऊन निर्णय द्यायचा असतो. या कायद्यात मुस्लिम पुरुषाला एकापेक्षा अधिक विवाहांच्या नोंदणीला मनाई आहे किंवा तिसऱ्या विवाहाच्या नोंदणीला मनाई आहे, असे कुठेही म्हटलेले नाही. विवाह नोंदणीबाबत पक्षकारांच्या व्यक्तीविषयक कायद्यातील तरतूदी महत्त्वाच्या असतात. मुस्लिमांच्या व्यक्तीविषयक कायद्याप्रमाणे मुस्लिम पुरुषाला एकावेळी चार पत्नींविषयी हक्क आहे, याविषयी प्रशासनांमध्येही वाद नाही. मग मुस्लिम व्यक्तीला एकाच विवाहाच्या नोंदणीचा हक्क आहे, हे महापालिकेचे म्हणणे मान्य होऊ शकत नाही. ते मान्य करायचे झाल्यास विवाह नोंदणीचा कायद्याच्या कायदा वरचढ व्यक्तीविषयक झाला किंवा व्यक्तीविषयक कायदा वगळला गेला, असे होईल. 

(हेही वाचा – बडतर्फ पोलीस अधिकारी Sachin Waje याला जामीन मंजूर)

त्यामुळे महापालिकेच्या म्हणण्यात कोणतेच तथ्य नसल्याने उपनिबंधकांचा आदेश रद्दबातल ठरवण्यात येत आहे’, असे खंडपीठाने आपल्या निर्णयात नोंदवले. शिवाय ‘याच याचिकाकर्त्याने यापूर्वी मोरोक्कोचे नागरिकत्व असलेल्या महिलेशी विवाह केला असताना ठाणे महापालिकेनेच त्या विवाहाची नोंदणी केली होती’, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.