धर्मादाय आयुक्तांनी उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली असून या याचिकेवर मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी खंडपीठाने निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांच्या अधिकारक्षेत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक अधिकारी कुठल्या अधिकारक्षेत्रात आणि कोणत्या न तरतुदींच्या आधारे धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांना निवडणूक काम करण्यास सांगू शकतात, असा सवाल खंडपीठाने केला. तसेच याबाबत निवडणूक आयोगाला बाजू मांडण्याचे निर्देश देत सुनावणी ५ मार्चपर्यंत तहकूब केली.
६० कर्मचाऱ्यांची केली होती मागणी
निवडणूक आयोगाकडून काम लादण्यात आलेल्या धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) तूर्तास दिलासा दिला आहे. निवडणूक कामाची सक्ती करणाऱ्या निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली.
निवडणूक आयोगाने आगामी निवडणूक कामासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयातील ६० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून तशी मागणी केली आहे. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रे जारी केली. सोबतच निवडणूक काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
Join Our WhatsApp Community