मराठा आरक्षणाचा विषय कायद्याच्या कचाट्यात सापडल्यावर राज्य सरकारने सवर्णांच्या आर्थिकदृष्टया मागास घटकाला नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात आले. मात्र याला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर गुरुवार, १ डिसेंबर रोजी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने या अंतर्गत देण्यात येणाऱ्या १११ नियुक्तीपत्रांना स्थगिती दिली.
१,१४३ जणांची निवड
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवड केलेल्या EWS कोट्यातील १११ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. सर्वसाधारण प्रवर्गामधील EWS च्या उमेदवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात नियुक्ती पत्रे दिली जाणार होती. मात्र ही पत्रे देण्याला विरोध दर्शवत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १ हजार १४३ जणांची निवड केली होती, त्यापैकी १११ जणांची नियुक्ती EWS अंतर्गत करण्यात येत होती. न्यायालयाने स्थगिती दिल्याने आता या उमेदवारांना नियुक्ती पत्रे देता येणार नाही. हा कार्यक्रम सुरु होण्याआधीच मराठा समाजाच्या काही जणांनी विरोध दर्शवला. कारण मराठा समाजाच्या उमेदवारांना आजच नियुक्ती पत्रे द्यावीत अशी मागणी केली आहे. अन्यतः कार्यक्रमच होऊ देणारेच अशी मागणी मराठा समाजच्या नेत्याची भूमिका आहे.
(हेही वाचा मुंबई विमानतळ ठप्प, कारण…)
Join Our WhatsApp Community