माघी गणेश जयंतीसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय Bombay High Court ने ठेवला कायम

46

महाराष्ट्रात माघी गणपती उत्सवापूर्वी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्ती बनवण्यावर आणि विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) गुरुवारी, 30 जानेवारीला  दिला. या वर्षी माघी गणपती जयंती १ फेब्रुवारीला आहे. गणपतीच्या जन्माचे स्मरण करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो आणि पारंपरिकपणे या दिवशी हिंदू देवतेच्या मूर्ती बनवल्या जातात.

पीओपी मूर्तींचे विसर्जन केल्याने जलस्रोतांमध्ये प्रदूषण होते, त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) अशा मूर्ती बनवण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) वापरण्यास बंदी घातली आहे. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे (Bombay High Court) यांच्या खंडपीठाने महाराष्ट्रातील स्थानिक अधिकाऱ्यांना आगामी उत्सवांपूर्वी पीओपी मूर्ती वापरण्यास मनाई करणाऱ्या सीपीसीबीने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

(हेही वाचा Kumbh Mela Stampede : दुर्घटनेनंतर सरकारने उचलली पावले, VIP पास रद्द, वाहनांना प्रवेशबंदी)

हे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), इतर सहा महानगरपालिका आणि राज्यातील चार नगरपरिषदांना देण्यात आले आहेत. न्यायालयाने अंतरिम टप्प्यावर बंदीच्या विरोधात मूर्ती निर्मात्यांच्या याचिकेवर विचार करण्यासही नकार दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० मार्च रोजी होईल.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.