मणिपूरचे ग्रामीण विकास पंचायती राज मंत्री खेमचंद युमनम यांच्या घराबाहेर बॉम्बस्फोट झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. या स्फोटात (Bombblast) सीआरपीएफ जवानासह एक जण जखमी झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गु्न्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे आमदार युमनाम खेमचंद यांच्या निवासस्थानाच्या बाहेर इंफाळ (Imphal) जिल्ह्यातील युमनाम लेइकाई येथे शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा बॉम्बस्फोट (Manipur Voilence) घडवण्यात आला. हा हल्ला कोणी केला, ते अद्याप कळलेले नाही. या हल्ल्यात सीआरपीएफ जवानासह एक महिला गंभीर जखमी झाली आहे. दिनेशचंद्र दास असे या जखमी जवानाचे नाव असून तो पश्चिम बंगाल येथील आहे. सुरक्षा जवान खेमचंद यांच्या निवासस्थानी तैनात होता. त्याच्या हाताला जखम झाली आहे.
Join Our WhatsApp Community