Bombshell Found: हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले

191
Bombshell Found: हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) सुरू असणाऱ्या माण-मारूंजी रस्त्यावर पुलाच्या कामादरम्यान रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले. पोलिसांनी हे बॉम्बशेल (Bombshell Found) ताब्यात घेतले आहे. याबाबत संरक्षण विभागाच्या सदन कमांडला कळविण्यात आले असून पुढील कार्यवाहीसाठी हे बॉम्बशेल त्यांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, माण-मारुंजी रस्त्यावर ब्ल्यू रिच सोसायटीच्या पाठीमागील बाजूला पीएमआरडीएमार्फत पुलाचे काम सुरू आहे. बुधवारी (३ एप्रिल) दुपारी जेसीबीने खोदकाम करून माती काढत असताना कामगारांना बॉम्बसदृश वस्तू आढळून आली. तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित वस्तूची पाहणी केली. त्यामध्ये रणगाड्याच्या बॉम्बचा पुढील भाग (बॉम्बशेल) असल्याचे आढळून आले.

(हेही वाचा – Ayodhya Ram Temple: अयोध्या बनले जगाची धार्मिक राजधानी, २ महिन्यांत १ कोटी भक्तांनी घेतले दर्शन; कशी केली जाते रामभक्तांची मोजणी, जाणून घ्या… )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.