Veer Savarkar : ‘६ सोनेरी पाने’ पुस्तकामुळे हिंदूंच्या अज्ञात इतिहासावर संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली; अनुराधा गोरे यांनी जागवल्या स्मृती

आजच्या काळात वीर सावरकरांवर सातत्याने टीका होते; कारण Veer Savarkar पचवून घेणे आणि समजून घेणे, फार कठीण आहे.

43

वीर सावरकरांचे (Veer Savarkar) माझी जन्मठेप हे पुस्तक मी ३ वेळा वाचले. प्रत्येक वेळी ते वेगळ्या पद्धतीने आकलन होते. माझ्या मुलानेही शाळकरी वयातच वीर सावरकरांची अनेक पुस्तके वाचल्याने त्याला सैन्यात भरती होण्याची प्रेरणा मिळाली. मी अनेक सैनिकांची, सैन्याधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यातील ती सगळी मंडळी सावरकर भक्त होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘६ सोनेरी पाने’ पुस्तकामुळे मला इतिहास संशोधनाची प्रेरणा मिळाली. त्या पुस्तकात मला अनेक अज्ञात राजे आणि राण्यांची माहिती मिळाली. गेली काही वर्षे मी त्यावरच संशोधन करत आहे, असे उद्गार लेखिका आणि वीरमाता अनुराधा गोरे यांनी काढले.

(हेही वाचा – Crime : वडिलांच्या तिजोरीतील ३ कोटींच्या हिऱ्यांची चोरी, मुलाला अटक)

अखिल भारत हिंदू महासभा (Hindu Mahasabha) परळ, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि अध्यात्म संशोधन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने वीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने दादर येथे सावरकर भक्तांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनेश भोगले, मुख्य वक्ते गोपाळ सारंग, तर विशेष अतिथी हरिश्चंद्र शेलार हे उपस्थित होते.

New Project 40 3

या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, सह कार्यवाह स्वप्नील सावरकर आणि सदस्य शैलेंद्र चिखलकर, स्मारकाच्या विश्वस्त आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नात असिलता सावरकर राजे याही उपस्थित होत्या.

अनुराधा गोरे (Anuradha Gore) यांनी हिंदूंच्या तेजस्वी, परंतु अज्ञात इतिहासावर प्रकाश टाकला. तसेच आजच्या काळात सावरकर विचारांचा कसा प्रसार होत आहे, हेही स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, आजच्या काळात वीर सावरकरांवर सातत्याने टीका होते; कारण सावरकर पचवून घेणे आणि समजून घेणे, फार कठीण आहे. आज ‘बटेंगे तो कटेंगे’ यासारख्या घोषणा ऐकल्या की, सावरकरांचे स्मरण होते. त्यांनीही गोवा मुक्ती संग्रामात (Goa liberation movement) ‘धर्मांतरण हे राष्ट्रांतर’, अशी हिंदूंना संघटित करणारी घोषणा केली होती. (Veer Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.